Video : निनाद यांचे पार्थिव निवासस्थानी दाखल, 'भारत माता की जय'च्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 09:46 AM2019-03-01T09:46:00+5:302019-03-01T09:59:40+5:30
देशातील सामीरेषेवर तणावाचे वातावरण असल्यामुळे नाशिकमध्येही पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवणअयात आला आहे.
नाशिक - शहीद निनाद मांडवगणे यांचे पार्थिव त्यांच्या नाशिकमधील डिजीपीनगर येथील घरी दाखल झाले आहे. सकाळपासूनच नाशिककरांनी त्यांच्या अत्यंदर्शनासाठी डिजीपीनगर येथे मोठी गर्दी केली आहे. देशातील सामीरेषेवर तणावाचे वातावरण असल्यामुळे नाशिकमध्येही पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवणअयात आला आहे. तर वायुसेनेचे वरीष्ठ अधिकारीही शहीद निनाद यांना मानवंदना देण्यासाठी दाखल झाले आहेत. वायू सेनेकडून निनाद यांना मानवंदना देण्यात आली आहे.
जम्मू-काश्मिरच्या भारत-पाक सीमेवर मागील चार दिवसांपासून निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थीतीत लढाऊ हेलिकॉप्टरद्वारे सीमेवर टेहळणी करत असताना हेलिकॉप्टर कोसळून वैमानिक निनाद अनिल मांडवगणे (वय ३३) यांना वीरमरण आले. निनाद हे मुळ नाशिकचे. त्यांचे माता-पिता बॅँकेतून सेवानिवृत्त असून ते पुणे महामार्गावरील रवीशंकर मार्गालगत बॅँक आॅफ इंडिया कॉलनीत वास्तव्यास आहे. निनाद यांचे पार्थीव वायुसेनेच्या विमानातून रात्री दहा वाजेच्या सुमारास ओझर विमानतळावर आणण्यात आले होते. त्यानंतर, आज सकाळीच नाशिकमधील डिजिपीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी निनाद यांचे पार्थिव ओझर येथून वायुसेनेच्या सजवलेल्या वाहनातून दाखल झाले आहे. शहीद निनाद यांचे पार्थिव त्यांच्या निवासात दर्शनासाठी कुटुंबियांकरिता ठेवण्यात आले. यावेळी भारतीय सैन्याकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. वायू सेनेतील वरिष्ठ अधिकारीही त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजर झाले आहेत. आज त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, आपल्या भूमीपुत्राला अखेरचा सलाम ठोकण्यासाठी निनाद यांच्या निवासस्थानी नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ -