Video: दहा जणांना चावा घेऊन जखमी करणाऱ्या तरसाला पकडण्यात अखेर यश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 03:13 PM2022-06-19T15:13:54+5:302022-06-19T15:22:11+5:30
कोरड्या विहिरीत पडलेल्या याच तरसाला ग्रामस्थांनी जिवनदान देऊन दाखवलेल्या भुतदयाची सिन्नर व निफाड तालुक्यात चर्चा होत आहे.
दत्ता दिघोळे- नायगाव (ता.सिन्नर जि नाशिक) - पिंपळगाव निपाणी ( ता.निफाड ) येथे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सुमारे दहा नागरिकांना चावा घेणाऱ्या तरसाला पकडण्यात वनविभाग व ग्रामस्थांना अखेर यश आले. कोरड्या विहिरीत पडलेल्या याच तरसाला ग्रामस्थांनी जिवनदान देऊन दाखवलेल्या भुतदयाची सिन्नर व निफाड तालुक्यात चर्चा होत आहे.
सिन्नर व निफाड तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे पंधरा दिवासांपुर्वी घराबाहेर झोपलेल्या छोट्या-मोठ्या सुमारे दहा जणांना चावा घेणाऱ्या हिंस्र झालेल्या तरसाला पकडण्यात वनविभाग व ग्रामस्थांना यश आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या हिंस्र झालेल्या तरसाची गाव परिसरात चांगलीच दहशत निर्माण केली होती.अनेकांना जखमी करणाऱ्या या प्राण्याला पकडण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले.मात्र कोणालाच यश आले नाही.त्यामुळे गावात रात्रीच्या वेळी फिरणे व शेतात काम करण्यास कोणी धजावत नव्हते. माणसाच्या अंगावर बेधडक धावणा-या तरसामुळे शेतात काम करण्यास मजूर मिळणे कठीण झाल्याने शेतीचे कामेही ठप्प झाली होती.
पाझर तलावा शेजारी असलेल्या बबन आबाजी बोडके यांच्या कोरड्या विहिरीत काही तरी पडल्याचा आवाज येत होता.पडलेला या प्राण्याची बातमी बोडके यांनी पोलिसपाटीलह.भ.प. शिवानंद भालेराव व सरपंच शिवाजी खाडे यांना सांगितली.या दोघांनी व शेजारील शेतकऱ्यांनी विहीरीत बघितलं असता गावातील नागरिकांना चावा घेतलेला हाच प्राणी असल्याचे अनेकांच्या नजरेस आले.काही लोकांनी हिंस्र झालेल्या या प्राण्यास वाचवु नका असाच विहिरीत राहुद्या अशी चर्चा सुरू झाली. मात्र ह.भ.प.शिवानंद पाटील व सरपंच शिवाजी खाडे यांनी शुक्रवारी ( दि.१७ ) याला मारण्यापेक्षा वनविभागाच्या ताब्यात देऊ असा सल्ला दिला.
सिन्नर व निफाड तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे पंधरा दिवासांपुर्वी घराबाहेर झोपलेल्या छोट्या-मोठ्या सुमारे दहा जणांना चावा घेणाऱ्या हिंस्र झालेल्या तरसाला पकडण्यात वनविभाग व ग्रामस्थांना यश आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. pic.twitter.com/pb1DCJfxQQ
— Lokmat (@lokmat) June 19, 2022
सर्वच ग्रामस्थांनी सहमती दर्शविल्या नंतर निफाड वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हेत्रे,वनपाल भगवान जाधव,वनरक्षक पंकज नागापुरे आदीसह रेस्क्यु टीम पिंपळगाव येथे दाखल झाली.सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नाने या तरशाला पकडण्यास यश आले.गेल्या पंधरा दिवसापुर्वी गाव व शिवारात राहणाऱ्या सुमारे दहा छोट्या-मोठ्यांना या तरशाने चावा घेऊन जखमी केल्याची घटना घडली होती.अंगणात झोपलेल्यांना चावा घेतल्यानंतर गावात तसेच शेजारील गावांमध्ये अनेक अफवाही पसरल्या होत्या.मात्र दिवसाही या तरशाने अनेकांवर हल्ले केल्याने अफवा शांत झाल्या. दरम्यान अनेकांना जखमी करणारा प्राणी विहिरीत पडल्याची बातमी शिवारात पसरताच बघ्यांची गर्दी झाली.या प्राण्याला मारण्या ऐवजी वनविभागाच्या ताब्यात देवून पिंपळगावकरांच्या भुतदयेची सध्या चर्चा होत आहे.