VIDEO : नाशिकच्या जाईजुईला मिळाले फॉरेनचे आईबाबा

By Admin | Published: May 29, 2017 02:49 PM2017-05-29T14:49:49+5:302017-05-29T16:30:12+5:30

आॅनलाइन लोकमत/अझहर शेख   नाशिक, दि. 29 - एकीकडे विवाहनंतरही अनेक वर्ष संतती प्राप्तीसाठी संघर्ष करणारे अनेक जोडपे समाजात ...

VIDEO: Jaijuain of Nashik got foreign mother | VIDEO : नाशिकच्या जाईजुईला मिळाले फॉरेनचे आईबाबा

VIDEO : नाशिकच्या जाईजुईला मिळाले फॉरेनचे आईबाबा

Next

आॅनलाइन लोकमत/अझहर शेख  

नाशिक, दि. 29 - एकीकडे विवाहनंतरही अनेक वर्ष संतती प्राप्तीसाठी संघर्ष करणारे अनेक जोडपे समाजात आढळून येतात. नैसर्गिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्टया काही कारणांमुळे त्यांना संततीसुख मिळत नाही तर दुसरीकडे समाजातील काही निष्ठुर मातांनी अनेकदा अर्भक बेवारस स्थितीत वर्दळीच्या ठिकाणी किंवा एखाद्या रुग्णालयाच्या परिसरात सोडून देत पोबारा केल्याच्या विविध घटनांमधून समोर आले आहे.

हा विरोधाभास आजही विविध शहरांमध्ये पाहवयास मिळतो. खरे तर अशा स्त्रीने बाळाला जन्म दिला असला तरी तिला माता म्हणणे योग्य ठरणार नाही कारण तिने नवजात अर्भकाला वाऱ्यावर सोडून मातृत्वाचे महत्त्व तर जाणलेच नाही; मात्र माणुसकीलाही काळीमा फासणारे कृत्य केलेले असते.

अशाच एका महिलेनं गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात बारा दिवसांचे दोन जुळ्या मुली एका रुग्णालयाबाहेर सोडून पोबारा केला होता. या स्त्रीने जरी पोटच्या मुलींना वाऱ्यावर सोडले असले तरी नियतीने मात्र अवघ्या नऊ महिन्यांतच नाशिकच्या आधाराश्रमात वाढणाऱ्या ‘जाई-जुई’ या जुळ्या बहिणींच्या झोळीत थेट अमेरिकेचे पालकत्व टाकले आहे.


केंद्र सरकारच्या सेंट्रल अ‍ॅडॉप्शन रिसोर्स आॅथॉरिटीमार्फत (कारा) राबविल्या जाणाऱ्या चाइल्ड अ‍ॅडॉप्शन रिसोर्स इन्फॉर्मेशन अ‍ॅण्ड गाइडन्स सिस्टम अर्थात केअरिंग प्रणालीच्या माध्यमातून जाई-जुईला अमेरिकेच्या न्यू-यॉर्क शहरात वास्तव्यास असलेल्या सुशिक्षित हिटगर दाम्पत्याने दत्तक घेतले आहे.

ख्रिस्तोपर डिटगर आणि तारा हिटगर असे या जोडप्याचे नाव आहे. या जोडप्यांना सात वर्षांची एक मुलगी आहे. या मुलीद्वारे संततीसुख मिळाले; मात्र त्यानंतर नैसर्गिक कारणांमुळे पुढे नियतीने त्यांचे संततीसुख हिरावून घेतले. त्यामुळे आपल्या आई-वडिलांच्या सल्ल्याने या दाम्पत्यानं भारतीय वंशाचे मुल दत्तक घेण्याचा निर्णय घेत ‘कारा’मार्फत अर्जाद्वारे इच्छा प्रदर्शित केली होती.

दोन दिवसांपासून नाशिकच्या घारपुरे घाट परिसरातील आधाराश्रमात हे दाम्पत्य मुक्कामी होते. जाई-जुई या दोन्ही बहिणी त्यांच्या अंगाखांद्यावर चांगल्या प्रकारे खेळू लागल्या आणि लवकरच रुळल्याने त्यांनाही आनंद झाला. पेशाने शिक्षक असलेल्या ताराच्या रुपाने त्यांना माता व नोकरी करणारे ख्रिस्तोपर यांच्या रुपात पिता मिळाल्यामुळे या मुलींचे पुढील आयुष्य बदलून जाणार आहे हे नक्की.

काय आहे ‘कारा’ची केअरिंग प्रणाली
‘कारा’ सरकारच्या सेंट्रल अ‍ॅडॉप्शन रिसोर्स आॅथॉरिटीमार्फत (कारा) काही वर्षांपूर्वी जन्मत: व्यंग किंवा गंभीर अनुवांशिक आजार असलेल्या विशेष काळजीच्या निराधार बालकांना पालकत्व लाभण्यासाठी केअरिंग नावाची प्रणाली सुरू करण्यात आली. या प्रणालीमुळे बालकांना परदेशी दाम्पत्यांच्या रुपाने पालकत्व मिळू लागले. ‘केअरिंग’च्या प्लॅटफॉर्मद्वारे नाशिक शहरातून बारावे मूल परदेशात दत्तक घेतले गेले आहे, अशी माहिती आधाराश्रमातील समन्वयक राहुल जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. जाई-जुई या सिकलसेल आजाराच्या रुग्ण असून या दोन्ही मुलींच्या हृदयालादेखील छिद्र आहे. त्यामुळे या चिमुकली विशेष गरजूंच्या गटात मोडतात.

https://www.dailymotion.com/video/x844zsq

Web Title: VIDEO: Jaijuain of Nashik got foreign mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.