VIDEO- ४१ वर्षांपासून कैलास तांबट साकारतात ‘युनिक गणराय’

By admin | Published: September 8, 2016 04:09 PM2016-09-08T16:09:00+5:302016-09-08T18:39:41+5:30

माणसाला सकाळी उठल्यावर लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत अशा सर्व वस्तुंचा खुबीने वापर करत नाशिकमधील रविवार पेठेतील चित्रकार कैलास तांबट यांनी यावर्षी ‘गुड मॉर्निंग गणेशा’ साकारला आहे.

VIDEO: Kailash Tambat is launching 'Unique Ganaraya' for 41 years. | VIDEO- ४१ वर्षांपासून कैलास तांबट साकारतात ‘युनिक गणराय’

VIDEO- ४१ वर्षांपासून कैलास तांबट साकारतात ‘युनिक गणराय’

Next

अझहर शेख, ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. ८ -  माणसाला सकाळी उठल्यावर लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत अशा सर्व वस्तुंचा खुबीने वापर करत नाशिकमधील रविवार पेठेतील चित्रकार कैलास तांबट यांनी यावर्षी ‘गुड मॉर्निंग गणेशा’ साकारला आहे. त्यांची ही युनिक गणेशमुर्ती बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असून तरुणाईला ‘सेल्फी’चा मोह आवरणे अवघड होत आहे.
गायत्री मंदिराशेजारी राहणारे कै लास तांबट हे दरवर्षी एक आगळी संकल्पना निवडून त्याआधारे गणरायाची उभारणी करतात. १९७५ सालापासून त्यांची हा उपक्रम अखंडितपणे सुरू आहे. त्यांनी साकारलेली गणेशमूर्ती परिसरातील युनिक गणेश म्हणून ओळखली जाते. यावर्षी तांबट यांनी चक्क ‘गुड मॉर्निंग’ संकल्पना निवडून गणराय साकारले आहे. सकाळी उठल्यावर सर्वसामान्य नागरिकाला ज्या-ज्या वस्तूंची गरज भासते त्या सर्व वस्तूंचा मोठ्या क ल्पकतेने आणि बुध्दीचातूर्याने वापर करत गुड मॉर्निंग गणेशमूर्ती साकारली आहे. यामध्ये झाडूपासून साबणापर्यंत आणि पैशापासून सिलिंडरपर्यंत अशा वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तांबट यांचा गणरायाचर उंदीरही अत्यंत लक्षवेधी आहे. टोस्ट ला वरच्याबाजूने दोन प्लॅस्टिकचे चमचे लाऊन कपबशी आणि चहाची गाळणीचा वापर करत गणरायाचे वाहन उंदीर त्यांनी साकारले आहे. त्यांनी बेसिनला लागणारा पाईप कौशल्यपुर्वक वापरत गरायची सोंड बनविली आहे. ही गणेशमुर्ती साकारताना त्यांनी काही प्लॅस्टिकच्या बरण्याही वापरल्या आहेत या बरण्यांमध्ये तांदूळापासून तर डाळी त्यांनी भरल्या आहेत.
गेल्या वर्षी तांबट यांनी कुंभमेळा संकल्पना घेऊन कुंभगणेश साकारला होता. त्यावेळी लहान मोठ्या माठांचा वापर त्यांनी खुबीने केला होता. १९८३ साली भारताने तत्कालीन कर्णधार कपिल देवच्या नेतृत्वाखाली प्रथमच विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे तांबट यांनी त्यावर्षी क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्टम्प्स्पासून तर चेंडूपर्यंत अशा सर्व साहित्यांचा वापर करत गणराय साकारले होते. तांबट म्हणतात की गणराय ही अश्?ाी देवता आहे, जी प्रत्येक वस्तूमध्ये दिसू शकते.

Web Title: VIDEO: Kailash Tambat is launching 'Unique Ganaraya' for 41 years.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.