VIDEO - नाशिकमध्ये घरावर मोबाईल टॉवर कोसळले
By Admin | Published: June 3, 2017 08:00 PM2017-06-03T20:00:46+5:302017-06-03T21:24:32+5:30
नाशिक : येथील गोविंदनगर परिसरातील एका इमारतीच्या छतावर असलेले मोबाईल कं पनीचे टॉवर वादळीवाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात कोसळल्याची घटना ...
नाशिक : येथील गोविंदनगर परिसरातील एका इमारतीच्या छतावर असलेले मोबाईल कं पनीचे टॉवर वादळीवाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात कोसळल्याची घटना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने इमारतीच्या अखेरच्या मजल्यावरील ज्या घराच्या छतावर हे टॉवर आहे, त्या घरात कोणीही रहिवाशी नव्हते. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान बंबासह घटनास्थळी पोहचले. दरम्यान, जवानांनी धोकादायक परिस्थितीची पाहणी करून धोका टळल्याची खात्री पटल्यानंतर ज्या कंपनीचे टॉवर आहे, त्या कंपनीसोबत संपर्क साधण्याचा सल्ला दिला. त्यानंतर परिसरातील रहिवाशांनी कंपनीशी संपर्क साधून सदर दुर्घटनेची माहिती कळविली. काही वेळेतच कंपनीचे कर्मचारी-अधिकारी घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी कोसळलेल्या टॉवरचा सांगाडा इमारतीवरून हटविला.
भाडेतत्त्वाने घरे, इमारतींवर मोबाईल टॉवर उभारणीसाठी कंपन्यांकडून मालकांना भली मोठी रक्कम दिली जात असली तरी हे टॉवर लावणे धोकादायक असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा सिध्द झाल्याची चर्चा परिसरात रंगली होती.