VIDEO : सोंगे मुखवटे तयार करुन आदिवासी संस्कृतीचे जतन
By Admin | Published: February 1, 2017 02:12 PM2017-02-01T14:12:10+5:302017-02-01T14:28:27+5:30
ऑनलाइन लोकमत पेठ (नाशिक), दि. 1 - वाढत्या तंत्रज्ञानाच्या काळात आदिवासी संस्कृती लोप पाऊ नये, यासाठी नाशिकमधील पांडुरंग शिंगाडे ...
ऑनलाइन लोकमत
पेठ (नाशिक), दि. 1 - वाढत्या तंत्रज्ञानाच्या काळात आदिवासी संस्कृती लोप पाऊ नये, यासाठी नाशिकमधील पांडुरंग शिंगाडे झटत आहेत. वाढत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे पारंपरिक संस्कृतीमधील अनेक मौल्यवान ठेवे दुर्लक्षित होऊ नयेत. यासाठी पेठ तालुक्यातील गढईपाडा येथील पांडुरंग यांनी आदिवासी संस्कृतीचा ठसा उमटवणाऱ्या सोंगे मुखवटे तयार करण्याचा छंद आजही जोपासला आहे.
शिंगाडे घराण्याची ही दुसरी पिढी या छंदात रममाण झाली असून कागदी लगद्यापासून तयार करण्यात आलेल्या विविध देवदेवतांच्या मुखवटयांना आकर्षक रंगानी रंगवून त्यांचा वापर भारूड, अखंड हरिनाम सप्ताह, भोवाडे आदी पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमात वापर केला जातो.
https://www.dailymotion.com/video/x844q8r