Video - शिंदेसमर्थक आमदार सुहास कांदेंना भेटणार का?; आदित्य ठाकरे म्हणाले, "निश्चित भेटू पण त्यांनी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 12:13 PM2022-07-22T12:13:07+5:302022-07-22T12:49:40+5:30

Aaditya Thackeray And Suhas Kande : आदित्य ठाकरे युवासैनिकांशी शिवसंवादच्या माध्यमातून संवाद साधत शक्तिप्रदर्शन करत आहेत. याच दरम्यान आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेनिमित्त नाशिकमध्ये असून थोड्यावेळपूर्वी ते काळाराम मंदिरात दाखल झाले होते.

Video Shivsena Aaditya Thackeray reply to Suhas Kande Over meeting in nashik | Video - शिंदेसमर्थक आमदार सुहास कांदेंना भेटणार का?; आदित्य ठाकरे म्हणाले, "निश्चित भेटू पण त्यांनी..."

Video - शिंदेसमर्थक आमदार सुहास कांदेंना भेटणार का?; आदित्य ठाकरे म्हणाले, "निश्चित भेटू पण त्यांनी..."

googlenewsNext

नाशिक - एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण राज्यातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. शिवसेनेला पडलेले भगदाड सावरण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. मुंबईत काढलेल्या निष्ठा यात्रेनंतर आता आदित्य ठाकरे युवासैनिकांशी शिवसंवादच्या माध्यमातून संवाद साधत शक्तिप्रदर्शन करत आहेत. याच दरम्यान आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेनिमित्त नाशिकमध्ये असून थोड्यावेळपूर्वी ते काळाराम मंदिरात दाखल झाले होते.

काळाराम मंदिरात त्यांनी दर्शन घेतले आहे. त्याचबरोबर मंदिर पुजाऱ्यांकडून विधिवत पूजा देखील केली आहे. आता काही वेळानंतर ते मनमाडकडे मार्गस्थ होणार आहेत. मात्र शिंदेसमर्थक आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी आव्हान दिल्यानंतर आदित्य ठाकरे मनमाडकडे जाणार का?, कांदे यांची भेट घेणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे. यावर आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं आहे. "कांदेंसोबतची भेट चालेल ना, निश्चित भेटू त्यांना पण त्यांनी मातोश्रीवर पण यावं, आम्ही कधीच मातोश्रीचे दरवाजे बंद केले नव्हते" असं म्हटलं आहे. 

"देवाकडे वेगळं काही मागितलं नाही, नेहमी दर्शन घ्यायला येतो त्यानुसार आलोय, बाकी काही नाही. जे दिलंय त्याबद्दल मी आभार मानत असतो, वेगळं काही मागत नाही. लोकांच्या समृद्धीची, आरोग्याची प्रार्थना करत असतो त्यामुळे आलोय. देवाच्या दारी राजकारण नको" असं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. सुहास कांदे यांचा मतदारसंघ असलेल्या मनमाडला आदित्य ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. यावेळी तब्बल 5 ते 6 हजार कार्यकर्ते घेऊन सुहास कांदे मनमाडला जाणार असून याबाबत अनेक होर्डिंग उभारण्यात आले आहेत. "माझं काय चुकलं" या आशयाखाली मतदार संघातील कामांची यादी आणि हिंदुत्व या विषयावरून शिवसेना कशी दूर गेली याचा पत्रात उल्लेख असणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.

"माझं काय चुकलं?", आदित्य ठाकरेंना सुहास कांदेंचं थेट आव्हान; विचारले 'हे' 10 सवाल

पालघरमधील साधू हत्याकांड, मालवणी येथील हिंदूच पलायन, स्वातंत्र्यवीर सावरकर या हिंदुत्वाच्या मुद्द्यापसून शिवसेना दूर गेली यावर माझं काय चुकल असं म्हणत कांदेंनी 10 सवाल केले आहेत. सुहास कांदे यांनी निवेदनात छगन भुजबळ, नवाब मलिक यांच्यासोबत युती केल्याची खंत देखील व्यक्त केली आहे. साहेबांना जेलमध्ये टाकण्याची हिंमत करणाऱ्या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसताना तुम्हाला यातना होत नाहीत का आदित्य साहेब? असा सवाल देखील कांदे यांनी विचारला आहे. निवेदन देण्याआगोदर सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल करत कांदेंनी आदित्य ठाकरे यांना अनेक सवाल केले आहेत. सुहास कांदे हे आदित्य ठाकरे यांना या सर्व प्रश्नाचे निवेदन देण्यासाठी पाच ते सहा हजार कार्यकर्ते घेऊन जाणार आहे. त्यांच्या या भुमिकेमुळे आदित्य यांच्या दौऱ्यात तणावाचे वातावरण आहे.
 

Web Title: Video Shivsena Aaditya Thackeray reply to Suhas Kande Over meeting in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.