Video: विहिरीत पडलेल्या मोराला ग्रामस्थांनी दिलं जीवदान; पर्यावरणदिनी कौतुकास्पद कार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 03:02 PM2021-06-05T15:02:53+5:302021-06-05T15:08:20+5:30
सिन्नर तालुक्यातील देशवंडी गावातील दगड्या मळ्यात आज( दि.५ ) पर्यावरण दिनीच सकाळी विष्णू पंडीत कापडी यांच्या विहिरीत मोर पडल्याचे जिवन कापडी यांना आढळून आले.
नायगाव (नाशिक) - सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे विहिरीत पडलेल्या मोराला गावातील युवकांनी बाहेर काढून जिवदान दिले.जागतीक पर्यावरण दिनी मोराला जिवदान दिल्याने ग्रामस्थांनी युवकांचे कौतुक केले आहे.
सिन्नर तालुक्यातील देशवंडी गावातील दगड्या मळ्यात आज( दि.५ ) पर्यावरण दिनीच सकाळी विष्णू पंडीत कापडी यांच्या विहिरीत मोर पडल्याचे जिवन कापडी यांना आढळून आले. सदर विहीर १७ ते १८ फूट पाण्याने भरलेली असल्याने एकट्याला जिवंत मोराला बाहेर काढता येत नसल्याचे बघून त्यांनी सरपंच दत्ताराम डोमाडे यांना माहिती दिली.तसेच शेजारील शेतकरी यादव कापडी,सोपान कापडी,योगेश विष्णू कापडी,सोमनाथ आव्हाड,शरद कापडी,सचिन कापडी,गणेश कापडी आदी तरुणांच्या मदतीने विहिरीत उतरून सदर मोराला विहिरीच्या बाहेर काढले. मोर कुठे जखमी नसल्याचे बघून त्यास नंतर दगड्या मळ्यातील वन विभागाच्या हद्दित सोडुन देण्यात आले.
सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे विहिरीत पडलेल्या मोराला ग्रामस्थांनी दिलं जीवदान pic.twitter.com/bJ8t4EqDoc
— Lokmat (@MiLOKMAT) June 5, 2021
दरम्यान देशवंडी,जायगाव,वडझिरे परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोरांसह अन्य पक्षी,प्राण्यांचा वावर वाढला आहे.वनविभाच्या जंगलात पाणी मिळत नसल्याने मोर पाणी पिण्यासाठी येत असल्याचे बोलले जात आहे.आज" जागतिक पर्यावरण "या दिवशी राष्ट्रीय पक्षी" मोर" यास जीवदान देऊन चांगला संदेश दिल्याने या युवकांचे सरपंच डोमाडे यांच्यासह ग्रामस्थांनी आभार मानले आहे.