Video viral : ट्रॅफिक पोलिसाकडून रिक्षावाल्यास मारहाण, जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 05:11 PM2019-06-07T17:11:36+5:302019-06-07T17:13:05+5:30

नांदूर नाक्यावर पुन्हा एकदा पोलिसांची दादागिरी पाहायला मिळाली.

Video Viral: Beaten by a traffic police, know the truth | Video viral : ट्रॅफिक पोलिसाकडून रिक्षावाल्यास मारहाण, जाणून घ्या सत्य

Video viral : ट्रॅफिक पोलिसाकडून रिक्षावाल्यास मारहाण, जाणून घ्या सत्य

Next

नाशिक : वाहूतक पोलीस आणि दुचाकी किंवा चारचाकी स्वारांचा वाद नवीन नाही. मात्र, अनेकदा या वादात वाहतूक पोलीस आपली मर्यादा ओलांडल्याचे दिसून येते. गाडीचालकास समजावून सांगत असताना चक्क मारहाणीपर्यंत हा वाद जातो. नाशिकच्या नांदूर नाक्यावर पुन्हा एकदा हा वाहतूक पोलिसाची दबंगगिरी पाहायला मिळाली. एका गरीब रिक्षावाल्यास वाहतूक पोलिसांनी चक्का लाथांनी मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

नांदूर नाक्यावर पुन्हा एकदा पोलिसांची दादागिरी पाहायला मिळाली. वाहतूक पोलिसाने एका गरीब रिक्षाचालकाला गंभीर मारहाण करत कायदा हातात घेतला आहे. लहान मुले आणि महिलांसमोर ही मारहाण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे व्हिडीओतील मुलगा घाबरत पोलिसांना हात जोडत आहे. तरीही पोलिसांकडून दादागिरी करण्यात येत आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात येत असून पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

 

सदरची घटना ही 19 एप्रिल 2019 रोजीची आहे. शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी तपोवन परिसरात वाहन तपासणी मोहीम राबवित असतांना त्यांना सदर रिक्षा क्रमांक एम एच 15 एफ यू 5840 चा चालक हा मागे चार व पुढे दोन असे अवैध प्रवासी वाहतूक करतांना आढळला असता त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने कर्मचाऱ्यांना कट मारून वाहन वेगाने पळविले. मागून आलेल्या दुचाकीस्वारानेही सदर रिक्षाचालकाने कट मारल्याची तक्रार पोलिसांना केली. नंतर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्यास थांबविले असता त्याने अर्वाच्य भाषा वापरत शिवीगाळ केल्याने कर्मचाऱ्यांनी सौम्य बळाचा वापर करत त्यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याजवळ गाडीची कागदपत्रे, लायसन्स, परमिट, बॅच-बिल्ला काहीही नसल्याने जवळील युनिटला नेले. दरम्यान, वेळप्रसंगी अश्या व्यक्तींना ठिकाणावर आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करावा लागतो. पोलिसांनी त्यास कुठल्याही प्रकारची हानी पोहचविली नाही.
अशोक नखाते- सहायक पोलीस आयुक्त, शहर वाहतूक शाखा.


 

Web Title: Video Viral: Beaten by a traffic police, know the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.