Video: अर्धनग्न तरुणाचं पवारांना निवेदन, सरकारवर दडपशाहीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 05:10 PM2019-04-24T17:10:18+5:302019-04-24T17:10:59+5:30
निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा पार पडली. या सभेमध्ये एक तरुण चक्क अर्धनग्न होऊन व्यासपीठावर आला आणि शरद पवारांना निवेदन दिलं.
नाशिक - दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाले यांच्या प्रचारासाठी निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा पार पडली. या सभेमध्ये एक तरुण चक्क अर्धनग्न होऊन व्यासपीठावर आला आणि शरद पवारांना निवेदन दिलं. काही दिवसांपूर्वी जमिनीच्या प्रश्नावर तरुणाने आंदोलन केलं होतं मात्र या तरुणाचं आंदोलन भाजपा सरकारकडून मोडीत काढण्याचा प्रयत्न केला गेला. सरकारने दडपशाही केल्याचा आरोप तरुणाने केला.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आले, कांद्याबाबत काय बोलले नाहीत. शेतकऱ्यांबाबत काय उल्लेख केला नाही. कारण शेतकऱ्यांना न्याय देण्याची या नेतृत्वाची ती भूमिका नाही असा आरोप त्यांनी सभेत केला. सरकारच्या धोरणांना विरोध करणाऱ्या त्या तरुणाचं नाव कृष्णा डोंगरे असं आहे. हे सरकार बदलणार नाही तोपर्यंट शर्ट घालणार नाही अशी भूमिका या तरुणाने घेतली आहे. डोंगरे यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन शरद पवारांना दिलं. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या तरुणाला आधार देत घाबरू नको, आपल्या मागण्या लवकरच मान्य होतील, 26 मे नंतर मी आपल्याला शर्ट पाठवून देईल असं आश्वासन दिलं.
नरेंद्र मोदी सभा घेण्यापूर्वी तेथील शेतकऱ्यांना अटक करतात आणि मगच त्या ठिकाणी पाऊल ठेवतात, शेतकऱ्यांना इतके घाबरणारा पंतप्रधान देश प्रथमच पाहतोय. आमच्या कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने पवार साहेबांसमोर आपली कैफियत मांडली. या भाजप सरकारला हद्दपार केल्याशिवाय जनता शांत बसणार नाही. pic.twitter.com/ZZwZFat2Sd
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) April 24, 2019
नरेंद्र मोदी सभा घेण्यापूर्वी तेथील शेतकऱ्यांना अटक करतात आणि मगच त्याठिकाणी पाऊल ठेवतात, शेतकऱ्यांना इतके घाबरणारा पंतप्रधान देश प्रथमच पाहतोय. आमच्या कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने शरद पवारांसमोर जी कैफियत मांडली. या भाजपा सरकारला हद्दपार केल्याशिवाय जनता शांत बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला दिला.
आगामी लोकसभा निवडणुकीत सात टप्प्यात मतदान होत असून तीन टप्प्यातलं मतदान पूर्ण झालं आहे. महाराष्ट्रात एकूण 4 टप्प्यात मतदान पार पडतंय. यामध्ये तीन टप्प्यातील मतदान पार पडलं असून अंतिम चौथा टप्प्यातील मतदान 29 एप्रिल रोजी होणार आहे. तर 23 मे रोजी लोकसभा निवडणुकींचा निकाल लागणार आहे.