नाशकात २५, २६ मार्चला विद्रोही साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:14 AM2021-02-15T04:14:19+5:302021-02-15T04:14:19+5:30
नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या एक दिवस आधीच नाशिक शहरात संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही साहित्य ...
नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या एक दिवस आधीच नाशिक शहरात संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही साहित्य संमेलन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.१४) शेकापच्या कार्यालयात झालेल्या संयोजन समितीच्या बैठकीत संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शशी उन्हवणे यांची निवड करण्यात आली आहे. तर उद्घाटनासाठी पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांना आमंत्रण देण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून काही तांत्रिक बाबींच्या अडचणी लक्षात घेत वकिलांचे एक पथकही यासाठी नियुक्त केल्याची माहिती प्रा. प्रतिमा परदेशी यांनी पत्रकार परिषेत दिली.
विद्रोही साहित्य संमेलनासाठी त्र्यंबक नाका परिसरातील शेकापच्या कार्यालयात संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. प्रतिमा परदेशी यांनी विद्रोही साहित्य संमेलनातील विविध समित्या तसेच पदाधिकारी नियुक्तीबाबत माहिती दिली. तत्पूर्वी संयोजन समिती व विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीची याठिकाणी बैठक झाली. या बैठकीत संमेलन स्थळ, उद्घाटक व स्वागताध्यक्ष व विविध समित्यांच्या निवडीवर चर्चा झाली. यात संमेलन स्वागताध्यक्षपद आणि संमेलनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली. मात्र साहित्य संमेलनस्थळाबाबत अजून चर्चा सुरू असून मंगळवारपर्यंत याविषयी घोषणा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. किशोर ढमाले यांनी प्रस्ताविकात विद्रोही चळवळीचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार असल्याचे सांगितले. महात्मा फुले यांना अपेक्षित असलेले आणि महात्मा फुलें यांनी ग्रंथकार सभेस लिहिलेल्या पत्रावर आधारित विद्रोही साहित्य संमेलन होणार असून २५ मार्चला संमेलनास प्रारंभ होऊन बाबूराव बागुल यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच २६ मार्चला संमेलनाचा समारोप होणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रभाकर धात्रक, डॉ. इंदिरा आठवले, डॉ. अनिल सोनवणे, वामनराव गायकवाड, नितीन भुजबळ, गणेश उन्हवणे, नीलेश सोनवणे, अर्जुन बागुल, यशवंत बागुल, डॉ. संजय जाधव, ॲड. मनीष बस्ते, राकेश वानखेडे, साराभाई वेळुंजकर, रंगराज ढेंगळे आदी उपस्थित होते.
अशी आहे संयोजन समिती
विद्रोही साहित्य संमेलनाच्या संयोजक समितीत मुख्य निमंत्रक डॉ. इंदिरा आठवले, मुख्य संयोजक कॉ. राजू देसले, कार्यवाह गुलाम शेख, प्रा. डॉ. अशोक दुलदुले, कार्याध्यक्ष प्रभाकर धात्रक, सहनिमंत्रक नितीन रोठे, सहसंयोजक नानासाहेब पटाईत, दत्ता वायचळे, व्ही. टी. जाधव, आसिफ शेख, संमेलन विश्वस्त ॲड. मनीष बस्ते, गणेश उन्हवणे, समन्वयक करुणासागर पगारे, किशोर ढमाले यांचा समावेश आहे. तर स्वागत समितीत राजेंद्र भोसले, राकेश वानखेडे, किरण मोहिते, डॉ. अनिल सोनवणे, डॉ. विशाल जाधव, नितीन डांगे-पाटील, शरद शेजवळ, डॉ. विद्या कसबे, डॉ. जालिंदर इंगळे, प्रा. ए. टी, कसबे, दिनेश ठाकरे, प्रा. डॉ. जयश्री खरे, चंद्रकांत गायकवाड, श्यामल चव्हाण, स्वाती त्रिभुवन, रविकांत शार्दूल, संजय डोंबाडे आदींचा समावेश असल्याची माहिती यशवंत मकरंद यांनी दिली.
===Photopath===
140221\14nsk_24_14022021_13.jpg
===Caption===
विद्रोही साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना ॲड. मनीष बस्ते, प्रभाकर धात्रक, किशोर ढमाले, शशी उन्हवणे, प्रतिमा परदेशी, गणेश उन्हवणे आदी.