प्रभाग ३० मध्ये ४२ कॅमेऱ्यांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 12:53 AM2019-07-30T00:53:19+5:302019-07-30T00:53:40+5:30
महापालिका हद्दीतील एकूण प्रभागांपैकी इंदिरानगर भागातील प्रभाग ३०चा सुमारे ९५ टक्के भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेखाली आला आहे. या प्रभागातील प्रत्येक चौकात युनिक ग्रुपच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने ४२ कॅमेºयांची प्रभागावर सूक्ष्म नजर असणार आहे.
इंदिरानगर : महापालिका हद्दीतील एकूण प्रभागांपैकी इंदिरानगर भागातील प्रभाग ३०चा सुमारे ९५ टक्के भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेखाली आला आहे. या प्रभागातील प्रत्येक चौकात युनिक ग्रुपच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने ४२ कॅमेºयांची प्रभागावर सूक्ष्म नजर असणार आहे. राजीवनगर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयांचे उद्घाटन वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात दोन व परिसरातील रस्त्यावर चार असे एकूण सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. परिसरात होणाºया घरफोड्या, सोनसाखळी चोरी आणि टवाळखोरीसह गुन्हेगारीस आळा बसण्यासाठी परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार प्रभागाचे सभागृहनेता सतीश सोनवणे यांच्या सहकार्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. त्यामुळे प्रभागातील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसण्यात आल्याने ९५ टक्के प्रभाग सीसीटीव्हीच्या नजरेखाली आला आहे. त्यामुळे अनेक वेळेस गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेºयांची मदत झाली आहे. यावेळी व्यासपीठावर आरोग्य सभापती दीपाली कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे उपस्थित होते. याप्रसंगी दत्तात्रेय पाळदे, सागर कोळी, अनिकेत सोनवणे, अनिल जाचक, सागर पाटील, कैलास देवांग यांसह नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन किशोर शिरसाठ यांनी केले.
या चौकात सीसीटीव्ही
भगवती चौक, राणेनगर चौफुली, लालबाग चौक, पांडव नगरी, कैलासनगर बस थांबा, कमोदनगर, चार्वाक चौक, राजीव टाउनशिप, नगरसेवक संपर्क कार्यालय परिसर.
प्रभाग भयमुक्त करण्याचे दिलेले आश्वासन टप्प्याटप्प्याने चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून पूर्ण करीत आहे. सीसीटीव्ही कॅमेºयांमुळे अनेक गुन्हे उघडीस येण्यास मदतच झाली असून, गुन्हेगारीस आळा बसला आहे.
- सतीश सोनवणे, सभागृह नेता