भरदिवसा बिबट्याचे दर्शन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 11:19 PM2019-01-05T23:19:24+5:302019-01-05T23:20:52+5:30
चांदवड : तालुक्यातील मेसनखेडे शिवारात शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास न्यायडोंगरीनजीक आबळू जेजुरे यांच्या शेतातील आहाळावर पाणी पिण्यासाठी बिबट्या आल्याने नागरिकांची घबराट उडाली.
Next
ठळक मुद्दे बिबट्या डोंगरात जवळच असलेल्या दरीत लपला.
चांदवड : तालुक्यातील मेसनखेडे शिवारात शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास न्यायडोंगरीनजीक आबळू जेजुरे यांच्या शेतातील आहाळावर पाणी पिण्यासाठी बिबट्या आल्याने नागरिकांची घबराट उडाली. नागरिकांनी आरडाओरड करताच बिबट्या डोंगरात जवळच असलेल्या दरीत लपला. त्यांनी घटनेची माहिती माजी सरपंच गंगाधर बिडगर यांना दिली. त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. वनकर्मचारी अशोक अहेर, नंदू पवार, नामदेव पवार, दमानंद कासव यांनी परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र परिसरात बिबट्या दिसल्याने घबराट पसरली आहे.