चांदोरी परिसरात बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 01:36 PM2018-10-09T13:36:37+5:302018-10-09T13:39:18+5:30
चांदोरी : शिवारातील कोटमे वस्ती ते सुकेणे फाटा परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे दिसल्याने नागरिकांमध्ये भिती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी वनविभाग अधिकारी सोबत संपर्क करून तात्काळ दखल घेत सुनील गायखे यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला.
चांदोरी : शिवारातील कोटमे वस्ती ते सुकेणे फाटा परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे दिसल्याने नागरिकांमध्ये भिती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी वनविभाग अधिकारी सोबत संपर्क करून तात्काळ दखल घेत सुनील गायखे यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला. सदर परिसर वस्तीचा आहे. या परिसरात दाट ऊसाचे मळे आहेत.उसाचे क्षेत्र बिबट्यासाठी लपण्याचे क्षेत्र आहे .परिसरात बिबट्या दिसून आला. त्या ठिकाणी पायाचे ठसेही असल्याने वन विभागातर्फे दखल घेत पिंजरा लावण्यात आला. गोदाकाठ परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन घडत असल्यामुळे वन विभागाने ठोस पावले उचलण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. बिबट्याच्या दहशतीने शेतीच्या कामांवर परिणाम होत आहे.मजूर काम करण्यास तयार झाले तरी रोजगार वाढून मागत आहे.याचा सर्व परिणाम शेतीवर होत आहे. गेल्या महिन्यात नागापूर फाटा येथे एक बछडा विहिरीत पडला होता.परिसरात ठिकाणी काही नागरिकांना बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. कोटमे वस्ती परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले होते. यावेळी वनक्षेत्रपाल संजय भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली भैय्या शेख यांनी पिंजरा लावला. या प्रसंगी सागर गडाख, हनुमंत जाधव,सुनील गायखे,विलास गडाख,महेंद्र गायखे आदी उपस्थित होते.