भ्रष्टाचार निर्मूलनासाठी दक्षता जनजागृती सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 02:33 PM2019-10-31T14:33:27+5:302019-10-31T14:36:20+5:30

कार्यालयांच्या दर्शनी भागावर दक्षता सप्ताहनिमित्ताने जनप्रबोधन करणारे भ्रष्टाचार निर्मूलनाबाबतचे सूचना फलकदेखील लावण्यात आले. तसेच शहरातील विविध बसस्थानक , रेल्वे स्थानकांसह अन्य गर्दीच्या ठिकाणी जाऊन कर्मचाऱ्यांनी नागरिकांना माहिती पत्रकांचे वाटप केले.

Vigilance Awareness Week for eliminating corruption | भ्रष्टाचार निर्मूलनासाठी दक्षता जनजागृती सप्ताह

भ्रष्टाचार निर्मूलनासाठी दक्षता जनजागृती सप्ताह

Next
ठळक मुद्देयेत्या २ तारखेला सप्ताहचा समारोप होणार आहेभ्रष्टाचार ही राज्यासह देशाच्या विकासाला लागलेली कीड

नाशिक :भ्रष्टाचारमुक्त राज्यासाठी यावर्षी ‘प्रामाणिक जीवनशैली’ ही संकल्पना घेत महात्मा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त भ्रष्टाचाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागनाशिकच्या वतीने दक्षता जनजागृतीपर सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. सप्ताहांतर्गत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविले जाणार आहे. येत्या २ तारखेला सप्ताहचा समारोप होणार आहे.
भ्रष्टाचार ही राज्यासह देशाच्या विकासाला लागलेली कीड आहे. या किडीच्या नायनाटासाठी जनप्रबोधन हा एकमेव उपाय असून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनीही दक्षता जनजागृती सप्ताहनिमित्त संदेश देत भ्रष्टाचारमुक्त राज्यासाठी नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, शरणपुररोड येथील नाशिक परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात बुधवारी (दि.३०) सप्ताहचे उद्घाटन करण्यात आले. २८ आॅक्टोबर ते २ नोव्हेंबर असा सप्ताहचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, भीत्तीपत्रके स्पर्धा घेतल्या जाणार आहे. शाळा, महाविद्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून जनजागृती केली जाणार असल्याचे विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी सांगितले.
या सप्ताहनिमित्ताने नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये तसेच परिक्षेत्रातील धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार या जिल्ह्यांमध्येही भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत विविध प्रबोधनात्मक उपक्रम होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, उपअधीक्षक सतीश भामरे, निरिक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या पथकाने ओढा टोल नाका, निफाड तहसिल कार्यालय, पोलीस ठाणे, पंचायत समिती कार्यालय, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन तेथे नागरिकांना लाचलुचतपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यप्रणालीविषयी माहिती दिली. तसेच या कार्यालयांच्या दर्शनी भागावर दक्षता सप्ताहनिमित्ताने जनप्रबोधन करणारे भ्रष्टाचार निर्मूलनाबाबतचे सूचना फलकदेखील लावण्यात आले. तसेच शहरातील विविध बसस्थानक , रेल्वे स्थानकांसह अन्य गर्दीच्या ठिकाणी जाऊन कर्मचाऱ्यांनी नागरिकांना माहिती पत्रकांचे वाटप केले.

खुली निबंध स्पर्धा
सप्ताहनिमित्ताने भ्रष्टाचाराच्या वाईट प्रवृत्तीविरोधी जनजागृती करण्यासाठी विभागाकडून खुली निबंध स्पर्धा राबविली जात आहे. यासाठी समाजाचा विकास-भ्रष्टाचार, प्रतिबंध व उपाययोजना, भ्रष्टाचार समाजाला लागलेली कीड, तंत्रज्ञानाचा वापर असे विषय दिले आहे. या विषयांवर ४०० शब्दांत निबंध लिहून विभागाच्या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Vigilance Awareness Week for eliminating corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.