वीजवाहिनी पडून बैल ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:35 AM2018-07-20T00:35:07+5:302018-07-20T00:35:24+5:30
ममदापूर : खरवंडी येथे विजेची तार पडून बैल ठार झाल्याची घटना घडली. येथील शेतकरी सोमनाथ विठ्ठल दाणे यांचे दोन बैल, दोन गायी त्यांच्या मळ्यातील गोठ्यात बांधले होते.
ममदापूर : खरवंडी येथे विजेची तार पडून बैल ठार झाल्याची घटना घडली. येथील शेतकरी सोमनाथ विठ्ठल दाणे यांचे दोन बैल, दोन गायी त्यांच्या मळ्यातील गोठ्यात बांधले होते.
सकाळी ८ वाजेच्या सुमारास अचानक मेन लाइनची वीजवाहिनी रोहित्रापासून तुटली व गोठ्यात बांधलेल्या बैलाच्या अंगावर पडली. त्यावेळी विद्युत पुरवठा सुरू असल्याने विजेच्या धक्क्याने बैल जागीच ठार झाला. दाणे यांनी सदर घटना वीज वितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचारी यांना कळविली. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बाविस्कर, तलाठी काळे तसेच विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता जगताप, उरपळे, लाइनमन गायकवाड, गिडगे, वाघ यांनी स्थळ पंचनामा केला. दाणे यांचे चाळीस हजार रु पयांचे नुकसान झाले असून, सध्या शेतीची कामे चालू असताना बैल दगावल्याने दाणे यांचे मोठे नुकसान झाले आहे. विद्युत वितरण कंपनीच्या राजापूर, ममदापूर, खरवंडी या परिसरात वीजवाहिन्या जीर्ण झाल्याने पावसाळ्यात केव्हाही आणि कुठेही तुटत असतात. ही बाब परिसरात नवीन नाही; परंतु दाणे यांच्या वस्तीजवळ असलेल्या रोहित्राजवळून वाहिनी तुटल्यामुळे दाणे यांचा बैल जागीच ठार
झाला.
या परिसरातील विद्युत तारा बदलून मिळाव्यात, अशा प्रकारे मागणी बऱ्याच दिवसांपासून असून, कंपनीचे अधिकारी, कर्मचारी ही गोष्ट मनावर घेत नसल्याने खरवंडी
येथील शेतकरी दाणे यांच्या बैलाचा बळी गेला असल्याचे बोलले जात आहे.