अर्धवेळ ग्रंथपालांची होणार सेवाज्येष्ठता पडताळणी ; नाशिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून विशेष शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 06:00 PM2019-01-27T18:00:38+5:302019-01-27T18:02:25+5:30
राज्यातील ५९६ अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ पदावर समायोजन करण्याविषयी शासन निर्णय जाहीर झाला असून केला असून त्यानुसार राज्यातील कार्यरत अधेर्वेळ/पूर्णवेळ ग्रंथपाल व रिक्त पदांची माहिती संकलनासाठी व जिल्ह्यातील अर्धवेळ ग्रंथपालांची सेवाज्येष्ठता तयार करण्यात आली आहे. या यादीतील माहीतीची पडताळणी करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालाने विशेष शिबिराचे आयोजन केले आहे.
नाशिक : राज्यातील ५९६ अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ पदावर समायोजन करण्याविषयी शासन निर्णय जाहीर झाला असून केला असून त्यानुसार राज्यातील कार्यरत अधेर्वेळ/पूर्णवेळ ग्रंथपाल व रिक्त पदांची माहिती संकलनासाठी व जिल्ह्यातील अर्धवेळ ग्रंथपालांची सेवाज्येष्ठता तयार करण्यात आली आहे. या यादीतील माहीतीची पडताळणी करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालाने विशेष शिबिराचे आयोजन केले आहे.
शिक्षण विभागाने यापूर्वी शिबिराच्या माध्यमातून ग्रंथपालांची माहीती संकलित करून संचालक कार्यालयास सादर केली होती. त्यानुसार सेवा ज्येष्ठत यादी तयार झाली आहे. परंतु, सर्व जिल्ह्यातील अर्धवेळ ग्रंथपालांची राज्यस्तरीय सेवाज्येष्ठता यादी तयार करण्याकामी जिल्ह्यातील ग्रंथपालांची सेवाज्येष्ठता यादी अंतिम होणे आवश्यक आहे. त्यासाठी संचालनालयाने दि.२३ जानेवारी २०१९ च्या पत्रानुसार सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी यांना या अर्धवेळ सेवाज्येष्ठता यादीसंदभार्तील वेळापत्रकानुसार कार्यक्रम निश्चित करून दिलेला आहे. या वेळापत्रकानुसार अर्धवेळ ग्रंथपालांनी त्यांची सेवाज्येष्ठतेमध्ये नमूद असलेल्या माहीतीची पडताळणी करण्यासाठी व हरकतींसाठी शिक्षण विभागाने विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबीरात सेवाज्येष्ठता यादितील दुरुस्त्या व हरकतींची नोंद घेण्यात येणार आहे. अंतीम सेवाज्येष्ठता यादीही यादिवशीच दुपारी ४ वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली असून हीच अंतिम सेवाज्येष्ठता यादी शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फ त संचलनालयाकडे सादर केली जाणार आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील अर्धवेळ ग्रंथपालांची सेवाज्येष्ठता यादी शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेत स्थळावर जाहीर करण्यात आली असून ग्रंथपालांनी आपल्या माहीतीची व सेवा ज्येष्ठतेबाबतची पडताळणी करुन घ्यावी व दुरूस्तीसाठी शिबिरात उपस्थित रहावे असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
शिबिरातच यादी अंतीम करण्याचा मानस
शिक्षण विभागाने हरकतींसाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतही वाढवून दिलेली आहे. तरीही शिबिरस्थळावरच सेवाज्येष्ठता यादी अंतिम करण्याचा मानस असून या शिबिरास संबंधित ग्रंथपालांनी उपस्थित रहावे असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.