नाशिक पंचायत समितीच्या उपसभापतीपदी विजय जगताप बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:15 AM2021-04-08T04:15:32+5:302021-04-08T04:15:32+5:30
नाशिक पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ व शिवसेनेचे २ सदस्य असे स्पष्ट बहुमत असल्याने बिनविरोध निवड झाली. ...
नाशिक पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ व शिवसेनेचे २ सदस्य असे स्पष्ट बहुमत असल्याने बिनविरोध निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार अनिल दौंडे यांनी काम पाहिले.
पंचायत समितीच्या उपसभापती छाया ढबाळे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. बुधवारी (दि.७) पंचायत समितीच्या सभागृहात सभापती विजया विलास कांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंड यांच्या उपस्थितीत निवडणूक घेण्यात आली. उपसभापतिपदासाठी विजय जगताप यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जगताप यांची बिनविरोध निवड घोषित केली. यावेळी पंचायत समिती सदस्य रत्नाकर चुंभळे, डॉ मंगेश सोनवणे, ढवळू भाऊ फसाळे, छाया ढबाळे, उज्ज्वला जाधव, कविता बेडंकुळे, आदी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित उपसभापती विजय जगताप यांचा सभापती व सदस्यांनी सत्कार करण्यात आला. तसेच जि.प.सदस्य शंकर धनवटे, सागर जाधव यांनी ही यावेळी सत्कार केला. (फोटो ०७ विजय)