विजय जानोरकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 02:05 PM2021-02-08T14:05:30+5:302021-02-08T14:10:09+5:30

नाशिक : फाळके फिल्म सोसायटीचे अध्यक्ष तसेच साप्ताहिक रसरंगचे संपादक विजय जानोरकर (७७) यांचे रविवारी राजीवनगरमधील त्यांच्या निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले.

Vijay Janorkar passes away | विजय जानोरकर यांचे निधन

विजय जानोरकर यांचे निधन

googlenewsNext
ठळक मुद्दे फाळके फिल्म सोसायटीची स्थापना राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे परीक्षण

नाशिक : फाळके फिल्म सोसायटीचे अध्यक्ष तसेच साप्ताहिक रसरंगचे संपादक विजय जानोरकर (७७) यांचे रविवारी राजीवनगरमधील त्यांच्या निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले.

नाशिकमध्ये १९६३ साली त्यांनी पत्रकारीतेचा प्रारंभ केला होता. प्रख्यात समीक्षक इसाक मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली जानोरकर यांनी चंदेरी दुनियेच्या पत्रकारीतेची सुरुवात केली. तसेच रसरंगचे संपादकपद त्यांनी प्रदीर्घ काळ भूषविले. रसरंगच्या माध्यमातून चित्रपट दुनियेतील पत्रकारीतेची अनोखी मुशाफीरी घडविल्याने त्यांना राज्यभरात वाचकवर्ग लाभला होता.  अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये जाऊन त्यांचे परीक्षण करण्याचे कार्यदेखील त्यांनी प्रदीर्घ काळ केले. हिंदी, मराठी चित्रपटांच्या मुंबईतील विशेष प्रिमीअरला त्यांना खास निमंत्रण देऊन त्यांच्याकडून अनेक दिग्दर्शक, निर्माते चित्रपटाबाबत मत विचारत, इतका या क्षेत्रात त्यांचा दबदबा होता.  नाट्य-चित्रपटाचे परीक्षण ही संकल्पना ज्यावेळी प्रचलीत नव्हती, त्या काळात त्यांनी लिहलेली रसपूर्ण परीक्षणे खूपच वाचकप्रिय ठरली होती. तसेच १९७९ साली त्यांनी काही अन्य मान्यवरांसह फाळके फिल्म सोसायटीची स्थापना केली होती. त्या माध्यमातून फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीव्दारे विविध देशांमधील अनेक कलात्मक चित्रपटांच्या शोचे त्यांनी नाशिकच्या रसिकांसाठी प्रदर्शन केले. रसिक प्रेक्षकांबरोबरच बालकांसाठीदेखील अनेक दर्जेदार आणि विनोदी चित्रपटांचे खुले प्रदर्शन करुन बालकांच्या जाणिवा समृद्ध करण्यातही योगदान दिले. त्यांच्या पार्थिवावर नाशिक अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

 

Web Title: Vijay Janorkar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.