ओझर मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी विजय शिंदे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 07:31 PM2020-11-04T19:31:52+5:302020-11-05T02:34:56+5:30

ओझर : येथील ओझर मर्चण्ट‌्स बँकेच्या चेअरमनपदी विजय भिकाजी शिंदे, व्हाइस चेअरमनपदी अरुण विष्णुपंत पवार, तर जनसंपर्क संचालक म्हणून विकास भट्टड यांची निवड करण्यात आली.

Vijay Shinde unopposed as chairman of Ozar Merchant Bank | ओझर मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी विजय शिंदे बिनविरोध

ओझर मर्चण्ट बँकेच्या चेअरमन विजय शिंदे व व्हा.चेअरमन अरुण पवार व विकास भट्टड यांचा सत्कार करताना ॲड. नितीन ठाकरे, भास्कर शिंदे आदींसह संचालक मंडळ.

Next
ठळक मुद्देव्हाइस चेअरमनपदी अरुण पवार; जनसंपर्क संचालकपदी विकास भट्टड

ओझर : येथील ओझर मर्चण्ट‌्स बँकेच्या चेअरमनपदी विजय भिकाजी शिंदे, व्हाइस चेअरमनपदी अरुण विष्णुपंत पवार, तर जनसंपर्क संचालक म्हणून विकास भट्टड यांची निवड करण्यात आली.

मावळते चेअरमन रवींद्र भट्टड तसेच संदीप अक्कर व प्रशांत चौरे यांनी रोटेशननुसार राजीनामा दिल्याने बँकेच्या भिकाजी भाऊराव शिंदे सभागृहात तालुका सहनिबंधक अभिजित देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडप्रक्रियेत विजय शिंदे व अरुण पवार यांना अनुक्रमे सूचक म्हणून रवींद्र भट्टड व संदीप अक्कर यांनी तर रत्नाकर कदम व राजेंद्र शिंदे यांनी अनुमोदन दिले. दोघांचे एक एक अर्ज आल्याने देशपांडेंनी सदर निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर भालचंद्र कासार यांनी विकास भट्टड यांच्या नावाची जनसंपर्क संचालक म्हणून घोषणा केली. नवीन पदाधिकाऱ्यांची निवड होताच फटाके फोडून स्वागत करण्यात आले. निवडीनंतर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे, मोहन पिंगळे, भास्कर शिंदे, भालचंद्र कासार, मेडिकल असोसिएशन व प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वैद्य व कर्मचाऱ्यांनी सत्कार केला. यावेळी संचालक नवनाथ मंडलिक, भालचंद्र कासार, रत्नाकर कदम, वसंत गवळी, भारत पगार, शरद सिन्नरकर, रउफ पटेल, लक्ष्मण सोनवणे, ज्ञानेश्वर आहेर, प्रशांत मोरे, प्रशांत चौरे, भारत पल्हाळ, जिजाबाई रास्कर, संजय सोनवणे, बाळासाहेब जाधव, मेघा पाटील आदी उपस्थित होते.

आज निफाडची मुख्य अर्थवाहिनी म्हणून ओमकोची ख्याती आहे. संस्थापकांनी घालून दिलेल्या आदर्शावर वाटचाल करू. एनपीए शून्यावर कसा आणता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे. आम्ही सर्व संचालक मिळून बँकेच्या प्रगतीचा आलेख असाच कायम ठेवणार आहोत.
- विजय शिंदे, चेअरमन, ओझर मर्चण्ट बँक.

 

Web Title: Vijay Shinde unopposed as chairman of Ozar Merchant Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.