सप्तश्रृंगगडावर विजयादशमीला बोकडबळीची प्रथा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 02:53 PM2019-10-08T14:53:20+5:302019-10-08T14:53:32+5:30
वणी : कीर्तिध्वज फडकाविल्यानंतर नवरात्र उत्साहाची सांगता भावभक्तीपुर्ण व धार्मिक वातावरण करण्यात आली. तर विजयादशमीला बोकडबळी प्रथा कायम ठेवण्यात ...
वणी : कीर्तिध्वज फडकाविल्यानंतर नवरात्र उत्साहाची सांगता भावभक्तीपुर्ण व धार्मिक वातावरण करण्यात आली. तर विजयादशमीला बोकडबळी प्रथा कायम ठेवण्यात आली. सोमवारी मध्यरात्रीचे सुमारास किर्ती ध्वजारोहणानंतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास शिखरावरु न एकनाथ गवळी यांचे गडावर आगमन झाले. परतीचा प्रवास सुखरु प पार पडल्यानंतर न्यासाच्या कार्यालयात त्यांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान कीर्तिध्वजाचे दर्शन घेतल्यानंतर अनेक भाविकांनी परतीच्या प्रवासासाठी मार्गक्र मण केले तर घटी बसलेल्या भाविकांनी घटाचे विसर्जन केले. विजयादशमीला सकाळपासुन भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या. राममंदीरापर्यंत बाऱ्या लागलेल्या होत्या. यज्ञकुंड व देवीचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी हजेरी लावली ती बोकडबळीच्या कार्यक्र माला. शिवालय तलावापासुन बोकडबळीचा मान असलेले तुकाराम गांगूर्ङे, दिगंबर गोधडे उपसरपंच राजेश गवळी, न्यासाचे विश्वस्त मंडळ अधिकारी ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ असे सर्व घटक यात सहभागी झाले होते. पहिल्या पायरीपर्यंत वाजतगाजत आलेली मिरवणुकीतील मानकरी व ग्रामस्थ तसेच पदाधिकारी यांनी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर पहिल्या पायरीपासुन सुमारे शंभर मिटर अंतरावर मानाच्या बोकडाचा बळी देण्यात आला. कायदा व सुव्यवस्थेचा सन्मान राखुन ही परंपरा पार पाडण्यात आल्याची माहीती राजेश गवळी यांनी दिली. नवरात्र उत्सव यशस्वितेसाठी न्यास कार्यकारी मंडळ सप्तशृंग गड ग्रामपंचायत व्यावसायिक ग्रामस्थ विविध प्रशासकीय व्यवस्था यांचे महत्वपुर्ण योगदान असल्याच्या भावनेमुळे नवरात्र उत्सव निर्विघ्न पार पडल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंङे, व्यवस्थापक भगवान नेरकर , सामाजिक कार्यकर्ते संदिप बेनके व पदाधिकाऱ्यांनी दिली.