विजयोत्सव : रामकुंडासह गांधीनगर व माणिकनगरमध्ये रावणदहनाच्या उत्सवाला लोटली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 09:30 PM2017-09-30T21:30:01+5:302017-09-30T21:40:13+5:30

विजयादशमीच्या मुहूर्तावर असत्यावर सत्याचा विजय म्हणून शहरात विविध सार्वजनिक मंडळांच्या व संस्थांच्या वतीने रावणदहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

 Vijayottasav: Ramkunda along with a crowd of people in Gandiragar and Maniknagar | विजयोत्सव : रामकुंडासह गांधीनगर व माणिकनगरमध्ये रावणदहनाच्या उत्सवाला लोटली गर्दी

विजयोत्सव : रामकुंडासह गांधीनगर व माणिकनगरमध्ये रावणदहनाच्या उत्सवाला लोटली गर्दी

Next
ठळक मुद्देशहरातील गोदाकाठ, गंगापूररोडवरील माणिकनगर, गांधीनगर, राजीवनगर आदि ठिकाणी रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहननाशिकच्या ढोल पथकाने आपल्या खास शैलीत ढोलवादन करत वातावरणात रंग भरला. अखेर रामलीलेतील प्रभू रामचंद्राच्या वानरसेनेचा विजय झाला.

नाशिक : विजयादशमीच्या मुहूर्तावर असत्यावर सत्याचा विजय म्हणून शहरात विविध सार्वजनिक मंडळांच्या व संस्थांच्या वतीने रावणदहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, नागरिकांची रावणदहन कार्यक्रमाला गर्दी लोटली होती. शहरातील गोदाकाठ, गंगापूररोडवरील माणिकनगर, गांधीनगर, राजीवनगर आदि ठिकाणी रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
गंगापूररोड परिसरात माणकिनगरमधील शिवसत्य मैदानावर तुळजाभवानी मंदीर ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आला होता. या उत्सवाची सांगता विजयादशमीच्या मुहूर्तावर सुमारे 50फुटी रावणाचा पुतळा दहणाने करण्यात आली . दशमुखी रावणाच्या पुतळ्यावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती . उपस्थित शेकडो नागरिकांनी रावण दहणापूर्वी रावणासोबत सेल्फी क्लीक केली . दरम्यान, पोलीस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांनी सपत्नीक देवीची पूजा केली. पूजेनंतर रावणाच्या प्रतिकात्मक पुतळा त्यांच्या हस्ते दहन करण्यात आला. यावेळी आमदार सीमा हिरे, नगरसेवक योगेश हिरे, महेश हिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रभू रामचंद्र की जय, बोल दुर्गा माते की जय अशा घोषणांनी मैदान दुमदुमले होते. नाशिकच्या ढोल पथकाने आपल्या खास शैलीत ढोलवादन करत वातावरणात रंग भरला. साडे आठ वाजेच्या सुमारास रावणाचे दहन करण्यात आले.

गांधीनगर येथे ६० फुटी रावण दहन

गांधीनगर येथे नवरात्री निमित्त आयोजित रामलीला नाटीकेचा समारोप हजारो नागरिकांच्या उपस्थितीत रावण दहनाच्या कार्यक्रमाने उत्साहात पार पडला.
गांधीनगर येथे नवरात्री निमित्त गेल्या ६२ वर्षापासून अखंडपणे रामलीला नाटीका सादर करण्यात येऊन दसºयाच्या दिवशी रावण दहानाने रामलीलेची सांगता होते. गांधीनगर येथील वेल्फेअर क्लबच्या मैदानावर रामलीला नाटीकेमध्ये शनिवारी सायंकाळी सात वाजता सुमारे तासभर प्रभू रामचंद्रांची वानरसेना व रावणाची राक्षस सेना यांच्यात घनघोर युद्धाचे दृश्य थेट मैदानावरच सादर करण्यात आले. यावेळी बाल गोपाळांकडून व उपस्थित नागरिकांकडून प्रभू रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय असा जयघोष सुरू होता. अखेर रामलीलेतील प्रभू रामचंद्राच्या वानरसेनेचा विजय झाला. यावेळी मैदानावर उभारण्यात आलेल्या ६० फुटी रावणाच्या भव्यदिव्य प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. यावेळी करण्यात आलेल्या नेत्रदीपक फटाक्याच्या आतषबाजीने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले होते.

रामकुंडावर रावणाच्या पुतळ्याचे दहन

पंचवटी : विजयादशमीच्यानिमित्ताने चतु:संप्रदाय आखाडयाच्या वतीने विजयाचे प्रतिक म्हणून रावणाच्या पुतळा दहन करण्यात आला.
शनिवारी सायंकाळी श्रीराम, लक्ष्मण, हनुमान, वानरसेना यांची परिसरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. रामकुंडावर मिरवणूकीचे आगमन झाल्यानंतर रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी भाविकांनी सियावर रामचंद्र की जय हो असा जयघोष केला . प्रभुरामाच्या भूमिकेत आदित्य शिंदे, रोहित कोठावदे (लक्ष्मण), विवेकानंद घोडके (हनुमान), छोटूराम आढळकर (रावण), राजू आढळकर (विभीषण), वैभव आवरकर (इंद्रजित), आदींनी भूमिका साकारल्या होत्या.

 

Web Title:  Vijayottasav: Ramkunda along with a crowd of people in Gandiragar and Maniknagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.