खामगावच्या सरपंचपदी विजयश्री कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:28 AM2021-02-21T04:28:36+5:302021-02-21T04:28:36+5:30
सदस्यांच्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीत अॅड. सुदामराव कदम, गणेश कदम यांच्या पुढाकाराने सातपैकी पाच जागा ...
सदस्यांच्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली.
ग्रामपंचायत निवडणुकीत अॅड. सुदामराव कदम, गणेश कदम यांच्या पुढाकाराने सातपैकी पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या. अॅड. कदम यांचे गेल्या ३५ वर्षांपासून ग्रामपंचायत व सहकारी सोसायटी राजकारणात वर्चस्व राहिले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विठ्ठल सोनवणे यांनी काम पाहिले. त्यांना तलाठी धर्माळे, ग्रामविकास अधिकारी चव्हाण यांनी सहाय्य केले. सभेस सदस्या अर्चना गणेश कदम, मंदा रमेश वाघ, देवीदास बर्डे हे उपस्थित होते. तर विरोधी गटाचे सदस्य गैरहजर राहिले. दरम्यान, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अॅड. सुदामराव कदम, संभाजी पवार, गणेश कदम, उत्तमराव आहिरे, गौतम आहिरे, रवी आहीरे, ज्ञानदेव कदम, लक्ष्मण कदम, भारत बोंबले, उत्तम बोंबले, गीताराम शेळके, नामदेव शेळके, शिवा गायकवाड, आण्णा बर्डे, रायभान बर्डे, श्रीहरी मोरे, साहेबराव मोरे, भरत वाघ, मछिन्द्र वाघ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो- २० खामगाव सरपंच
===Photopath===
200221\20nsk_51_20022021_13.jpg
===Caption===
फोटो- २० खामगाव सरपंच