विद्युत वितरण कंपनीची विक्र मी वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:11 AM2018-04-14T00:11:17+5:302018-04-14T00:11:17+5:30

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने दिंडोरी तालुक्यात विक्रमी वसुली केली आहे. प्रशासकीय यंत्रणांना मार्च वसुलीचे टार्गेट एक आव्हानात्मक काम असते. त्यातही वीजबिल वसुली ही तारेवरची कसरतच. विद्युत वितरण कंपनीच्या दिंडोरी विभागाने ग्रामीण कार्यक्षेत्रात ९० टक्के इतकी विक्रमी वसुली केली आहे. तालुक्यात घरगुती औद्योगिक व वाणिज्य असे २२ हजार १९२ वीजग्राहक असून, कृषी ग्राहकसंख्या १४ हजार इतकी आहे.

 Vikram M Recovery of Power Distribution Company | विद्युत वितरण कंपनीची विक्र मी वसुली

विद्युत वितरण कंपनीची विक्र मी वसुली

Next

वणी : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने दिंडोरी तालुक्यात विक्रमी वसुली केली आहे. प्रशासकीय यंत्रणांना मार्च वसुलीचे टार्गेट एक आव्हानात्मक काम असते. त्यातही वीजबिल वसुली ही तारेवरची कसरतच. विद्युत वितरण कंपनीच्या दिंडोरी विभागाने ग्रामीण कार्यक्षेत्रात ९० टक्के इतकी विक्रमी वसुली केली आहे. तालुक्यात घरगुती औद्योगिक व वाणिज्य असे २२ हजार १९२ वीजग्राहक असून, कृषी ग्राहकसंख्या १४ हजार इतकी आहे.  वीजग्राहकांचे संपूर्ण वीजबिल एक कोटी ९२ लाख रुपये आहे. ७० लाख रुपये इतकी थकबाकी होती. त्यापैकी सहायक अभियंता नारायण सोनवणे व त्यांच्या चमूने ९० टक्के विक्रमी वसुली केली.  मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता सुनील पावडे, कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे यांच्या वतीने सहायक अभियंता सोनवणे व सहकाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.

Web Title:  Vikram M Recovery of Power Distribution Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.