‘शाहू’ रिफाईन्ड शुगर बनविणार विक्रमसिंह घाटगे

By admin | Published: October 16, 2014 10:13 PM2014-10-16T22:13:27+5:302014-10-16T22:50:08+5:30

शाहू साखर कारखान्याचा ३५ वा बॉयलर प्रदीपन समारंभ

Vikramsinh Ghatge will make Shahu refined sugar | ‘शाहू’ रिफाईन्ड शुगर बनविणार विक्रमसिंह घाटगे

‘शाहू’ रिफाईन्ड शुगर बनविणार विक्रमसिंह घाटगे

Next

कागल : देशामध्ये साखर आणि ऊस उत्पादन भरपूर झाले आहे. साखर उद्योग नियंत्रणमुक्त झाला आहे. साखरेचा ग्राहकही चोखंदळ बनला आहे. म्हणून छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना रिफाईन्ड शुगर बनविणार आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे यांनी दिली. शाहू साखर कारखान्याचा ३५ वा बॉयलर प्रदीपन समारंभ विक्रमसिंह घाटगे आणि सुहासिनीदेवी घाटगे यांच्या हस्ते विधीवत करण्यात आला. यावेळी समरजितसिंह घाटगे, नवोदितादेवी घाटगे प्रमुख उपस्थित होते. विक्रमसिंह घाटगे म्हणाले, सोलापूर, पुणे विभागातील साखर कारखाने सुरू झाले आहेत. ऊस प्रचंड असल्याने गळीत हंगाम तेथे सुरू झाला आहे. आपणही लवकरच हंगाम सुरू करूया. वीज प्रकल्पाचे कर्ज फिटत आले आहे. बायोगॅसपासून ऊर्जा निर्मिती करण्याचाही विचार आहे. वार्षिक सभेत जाहीर केल्याप्रमाणे दसरा-दिवाळीसाठी १५० रुपयांचा उसाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. देशात सध्या ६५ लाख क्विंटल, तर राज्यात २५ लाख क्विंटल साखर शिल्लक आहे. शाहू साखर कारखान्यातही २ लाख ५५ हजार ७३७ क्विंटल साखर शिल्लक आहे. कारखान्याने १ लाख ५९ हजार ९०० क्विंटल साखर निर्यात केलेली आहे. चालू हंगामात ८ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. सर्वांच्या सहकार्याने ते पूर्ण करूया. कारखान्याचे संचालक समरजितसिंह घाटगे म्हणाले, नवीन-नवीन साखर कारखान्यांची भर पडत आहे. आपल्या कारखान्याकडे पुरेसा ऊस आहे. मात्र, आठ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप पूर्ण करण्यासाठी हंगाम वेळेवर सुरू झाला पाहिजे, याची दक्षता घेऊया. कार्यकारी संचालक विजय औताडे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष एस. के. मगदूम, कागलच्या उपनगराध्यक्षा उषाताई सोनुले, कागल बॅँकेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, शाहू कृषी संघाचे उपाध्यक्ष रामचंद्र खराडे, सुनील सूर्यवंशी, बाळ पाटील, दत्तामामा, खराडे, नम्रता कुलकर्णी, शाहू साखरचे सर्व संचालक उपस्थित होते. (प्रतिनिधी) पहिला हप्ता २५३० विक्रमसिंह घाटगे म्हणाले, शाहू साखर कारखान्याची एफ.आर.पी. २४०० च्या पुढे पोहोचली आहे. चालू वर्षी कारखान्याला २५३० इतकी एफ.आर.पी. बसली आहे. ती द्यावीच लागते. त्यामुळे आता हंगामाची लवकरच सुरुवात करूया.

Web Title: Vikramsinh Ghatge will make Shahu refined sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.