विल्होळी माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्र माचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 04:43 PM2020-09-16T16:43:18+5:302020-09-16T16:43:42+5:30

विल्होळी : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या उपक्र माचा शुभारंभ विल्होळी ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आला.

Vilholi launches my family my responsibility undertaking macha | विल्होळी माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्र माचा शुभारंभ

विल्होळी माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्र माचा शुभारंभ

Next
ठळक मुद्देकोरोनाचा प्रसार होऊ नये त्यासाठी या योजनेची सुरु वात

विल्होळी : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या उपक्र माचा शुभारंभ विल्होळी ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती माजी सभापती रत्नाकर चुंबळे, सहाय्यक गट विकास अधिकारी विनोद मेढे, डॉ. गौरी भोई, ग्रामविकास अधिकारी बळीराम पगार, आरोग्यसेवक मनोज डोंगरे, आरोग्यसेविका सोनाली पगार, आशा गटप्रवर्तक अरु णा गडाख, ग्रामस्थ भास्कर थोरात, अ‍ॅड. बाजीराव गायकवाड, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
शासनाच्या उपक्र मानुसार माझे कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्र म ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येत आहे. हा उपक्र म दोन टप्प्यात असून पहिला टप्पा १५ सप्टेंबर १० आॅक्टोबर, दुसरा टप्पा १४ ते २४ आॅक्टोबर या कालावधीत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व बेडची असलेली कमतरता लक्षात घेता ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार होऊ नये त्यासाठी या योजनेची सुरु वात करण्यात आलेली आहे. प्रत्येक दिवसाला पन्नास कुटुंबांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये ताप चेक करणे, आॅक्सिजन चेक करणे, बीपी चेक करणे, मधुमेह चेक करणे, तसेच इतर काही आजार असल्यास त्याबाबतची तपासणी करून त्याबाबतची माहिती आॅनलाइन भरणे. कुटुंबात कोणीही आजारी असल्यास त्यावर उपचार केले जाणार आहेत.
प्रतिक्र ीया...
शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्र म अनुसार आज विल्होळी येथे शुभारंभ करु न आमची टीम प्रत्येक घरात जाऊन घरातील सर्व व्यक्तींची ताप चेक करणे, आॅक्सिजनचे करणे, कोणाला काही त्रास असल्यास विचारणा करणे, आजारी असल्यास उपचार करणे, घरातील सर्व सदस्यांची आॅनलाइन नोंदणी करण्यास सुरु वात केली आहे.
- डॉ. गौरी भोई, विल्होळी उपकेंद्र.
शासनाच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ उपक्र मांतर्गत विल्होळी ग्रामपंचायत स्तरावर टीम तयार असून दोन टप्प्यात असलेल्या उपक्र मात घरातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी करून आॅनलाईन माहिती दिली जाईल.
- विनोद मेढे, प्रशासक , विल्होळी. 

Web Title: Vilholi launches my family my responsibility undertaking macha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.