विल्होळीजवळ होणार ‘मिग विमान दर्शन’

By Admin | Published: June 19, 2017 01:21 AM2017-06-19T01:21:05+5:302017-06-19T01:21:26+5:30

महापालिकेची मागणी फळाला : मिग विमानांची प्रतिकृती; एचएएल करणार लाखोंचा खर्च

Vilholi will be near the 'MIG aircraft view' | विल्होळीजवळ होणार ‘मिग विमान दर्शन’

विल्होळीजवळ होणार ‘मिग विमान दर्शन’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरात वाहतूक बेट म्हणून जिल्ह्याची ओळख असलेल्या मीग विमानाची प्रतिकृती मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या महापालिकेची मागणी तब्बल पंधरा वर्षांनंतर मान्य झाली असून, विल्होळी येथे दोन मिग विमानांच्या प्रतिकृती बसविण्यासाठी एचएएल राजी झाली आहे. संरक्षण खात्याने मान्यता दिल्याने ही तयारी एचएएल व्यवस्थापनाने केली आहे. ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कारखान्यात आता सुखोईचे काम चालत असले तरी सुरुवातीला मीग विमानांचा कारखाना म्हणूनच ओळख होती. हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री धावण्याच्या घटनेचे ऐतिहासिक स्मरण त्याच्याशी जोडले गेले आहे.
यशवंतराव चव्हाण यांना नाशिककरांनी बिनविरोध दिल्यानंतर नाशिककरांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मीग कारखाना भेट म्हणून दिला. त्यामुळे नाशिकचे नाव औद्योगिक क्षेत्रात देशभरात पोहोचले गेले आणि नाशिकला नवी ओळख मिळाली. त्यामुळे नाशिकमध्ये एखाद्या ठिकाणी खऱ्या मिग विमानाची प्रतिकृती (सांगाडा) मिळावी यासाठी शोभाताई बच्छाव महापौर असताना त्यांनी प्रयत्न केले होते. विल्होळी येथे शहराच्या प्रवेशाच्या ठिकाणी सुमारे एक एकर जागा असून, तेथे हिरवळ लावून सुशोभित करण्यात येणार आहे. दोन मिग विमानांची प्रतिकृती बसवण्यात आल्यानंतर या सर्वच भूखंडाच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च करण्यासाठी एचएएल व्यवस्थापन तयार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. एचएएलने कराराचा मसुदा तयार केला असून, लवकरच मनपा व व्यवस्थापनात करण्यात येणार आहे.

Web Title: Vilholi will be near the 'MIG aircraft view'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.