कुपोषित, अतिकोपोषित बालकांसाठी ग्राम बालविकास केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:27 AM2019-07-28T00:27:05+5:302019-07-28T00:29:46+5:30

तरसाळी : महिला बालकल्याण केंद्राअंतर्गत औंदाणे, कौतिकपाडे, यशवंतनगर,तरसाळी येथील अंगणवाड्यामध्ये कुपोषित व अतिकोपोषित बालकांनसाठी ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात ...

Village Child Development Center started for malnourished, overweight children | कुपोषित, अतिकोपोषित बालकांसाठी ग्राम बालविकास केंद्र सुरू

तरसाळी येथे अंगणवाडी केंद्रात ग्रामबालविकास केंद्र सुरू करण्यात आले. त्याप्रसंगी राकेश रौंदळ, एन. एम. देवरे, लखन पवार व अंगणवाडी सेविका आदि.

googlenewsNext
ठळक मुद्देआरोग्य विभागाकडून औषधे देण्यात येणार आहेत.

तरसाळी : महिला बालकल्याण केंद्राअंतर्गत औंदाणे, कौतिकपाडे, यशवंतनगर,तरसाळी येथील अंगणवाड्यामध्ये कुपोषित व अतिकोपोषित बालकांनसाठी ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आले आहेत. अंगणवाड्यामध्ये कुपोषित व अतिकुपोषित बालके आढळून आले असल्यामुळे त्यांचा शारीरिक विकास व्हावा त्याअनुषंगाने महिला बाल विकास केंद्राअंतर्गत अंगणवाड्यामध्ये ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
या केंद्राच्या माध्यमातून कुपोषित बालकांना दिवसभरात अमायलेजनयुक्त पिठाचे अन्न, अंडी, केळी, बालकोपरा तसेच आरोग्य विभागाकडून औषधे देण्यात येणार आहेत. मिहनाभर ही केंद्र सुरू राहणार असल्याची माहिती मुख्य सेविका संगिता घोलप यांनी दिली.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच वैशाली मोहन, ग्रामपंचायत सदस्य लखन पवार, ग्रामसेवक एन. एम. देवरे, अरु ण मोहन, जगदीश रौंदळ, कमल गांगुर्डे, अंगणवाडी सेविका सुमन रौंदळ, पुंडलिक जाधव उपस्थित होते.
 

Web Title: Village Child Development Center started for malnourished, overweight children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.