जऊळुके दिंडोरी येथे ग्राम आरोग्य सेवा केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 06:42 PM2020-07-26T18:42:08+5:302020-07-26T18:43:20+5:30

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जऊळुके दिंडोरी येथे ग्राम आरोग्य सेवा केंद्र ग्रामपंचायत मार्फत सुरू केले आहे. या केंद्रात सर्व प्रकारचे प्राथमिक उपचार व औषधे मोफत दिली जाणार आहेत.

Village Health Service Center started at Jauluke Dindori | जऊळुके दिंडोरी येथे ग्राम आरोग्य सेवा केंद्र सुरू

जऊळुके दिंडोरी येथे ग्राम आरोग्य सेवा केंद्र सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देसर्व प्रकारचे प्राथमिक उपचार, औषधे मोफत मिळणार

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जऊळुके दिंडोरी येथे ग्राम आरोग्य सेवा केंद्र ग्रामपंचायत मार्फत सुरू केले आहे. या केंद्रात सर्व प्रकारचे प्राथमिक उपचार व औषधे मोफत दिली जाणार आहेत.
जऊळके दिंडोरी हे गाव तीन ते साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. हे गाव मुंबई हायवे लगत असून या गावात मोठ्या प्रकारे एमआयडीसी कंपन्या असल्यामुळे ग्रामपंचायत व गावातील नागरिक कोरोनाच्या महामारीमुळे चिंताग्रस्त राहत असल्यामुळे तसेच या गावात प्राथमिक आरोग्य केंद्रही नसल्यामुळे ग्रामपंचायतीने आरोग्य सेवा केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात सर्व प्रकारचे प्राथमिक उपचार, लहान मुलांना वाफ देणे, ज्येष्ठ नागरिकांचा रक्तदाब चेक करणे, तसेच औषधे गोळ्या मोफत दिले जात आहेत. या केंद्रात आशा कार्यकर्त्यांमार्फत प्रत्येक कुटुंबाची तपासणी करण्यात येत आहे. गावामध्ये कोणीही आजारी पडू नये किंवा कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे.

आमचे गाव मुंबई हायवे लगत असून या गावात अनेक प्रकारच्या कंपन्या आहेत. त्यामुळे आमच्या गावातील नागरिक कायमच चिंताग्रस्त राहत होते. त्यामुळे गावात योग्य उपाययोजना केल्यामुळे आज आमच्या गावात एकही करोना रुग्ण नाही. गावातील नागरिक आजारी पडायला नकोत, त्यामुळे गावात ग्रामपंचायतीच्या वतीने ग्राम आरोग्य सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना सर्व प्रकारचे प्राथमिक उपचार व लहान मुलांना वाफ देणे ज्येष्ठांचे रक्तदाब चेक करणे. औषधे मोफत दिले जातात.
- भारती जोंधळे, सरपंच, जऊळके दिंडोरी
(फोटो : 26जानोरी1,2)

Web Title: Village Health Service Center started at Jauluke Dindori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.