पाणी न मिळाल्यास पुढाऱ्यांना गावबंदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 08:45 PM2019-09-19T20:45:35+5:302019-09-19T20:46:00+5:30
माळवाडी : नाशिक जिल्ह्यात पूर्ण पावसाळ्यात देवळा तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. तालुक्यातील नदी, नाले, पाझर तलाव अजूनही कोरडे पडले आहेत. हे लक्षात घेऊन तातडीने माळवाडीसह लोहणेर शिवारातील तानाजी पाझर तलाव चणकापूर उजव्या कालव्याच्या पाण्याने भरून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
माळवाडी : नाशिक जिल्ह्यात पूर्ण पावसाळ्यात देवळा तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. तालुक्यातील नदी, नाले, पाझर तलाव अजूनही कोरडे पडले आहेत. हे लक्षात घेऊन तातडीने माळवाडीसह लोहणेर शिवारातील तानाजी पाझर तलाव चणकापूर उजव्या कालव्याच्या पाण्याने भरून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गत व चालुवर्षी देवळा तालुक्याच्या अनेक भागात अत्यल्प पाऊस झाला, त्यामुळे अजूनही दुष्काळी परिस्तिती कायम आहे. यामुळे चणकापूर उजव्या कालव्याद्वारे रामेश्वर धरण भरण्यात आले असून, रामेश्वर धरणातून पूर्व भागासाठी वाढीव कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. मात्र चणकापूर उजव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील माळवाडी, फुलेमाळवाडी सरस्वतीवाडी, तानाजी पाझर तलाव येथील शेतकरी या पाण्यापासून वंचित आहेत.
या कालव्याचे पाणी खाटकी नाल्याद्वारे माळवाडी येथील पाझर तलाव व तानाजी पाझर तलाव भरण्यात यावे, अशी मागणी या परिसरातील शेतकरी बांधव करीत आहेत. पण अद्याप या मागणीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. यामुळे आता परिसरातील शेतकºयांनी पाणी न मिळाल्यास तहसीलदारांना निवेदन देऊन पुढाºयांना गावबंदी व मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्याचे ठरविले आहे.
अत्यल्प पावसामुळे विहिरींना अजूनही पाणी आलेले नाही. पावसाळा संपत आला आहे, त्यात आता विहिरींना पाणी नाही म्हणून पुढील हंगामात शेती करणं अवघड होईल की काय? अशी चिंता आता शेतकºयांना भेडसावू लागली आहे.
निवेदनावर जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाठ, सरपंच शिवाजी बागुल, सरपंच उषा शेवाळे, सुशांत गुंजाळ, संतोष बागुल, सतीश बागुल, विकी बच्छाव, बापू बागुल, डॉ संदीप बागुल, हेमंत बागुल, वैभव बागुल, किरण बच्छाव, भगवान बागुल, महेंद्र सोनवणे, जितेंद्र बागुल, लंकेश बागुल, बाळासाहेब बच्छाव आदीच्या स्वाक्षरी आहेत.
गेल्या दीड महिन्यांपासून इतरत्र उजव्या कालव्याचे पाणी दिले जात आहे. तसेच पाणी माळवाडीसह तानाजी पाझर तलावात द्यावे या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणून आम्ही आता २१ सप्टेंबर पासून उपोषण व गाव बंदीची हाक देत आहोत.
- रमेश अहिरे, अध्यक्ष, समता परिषद, लोहणेर.
तूर्तास पाऊस जरी पडतो आहे, पण त्या पावसाने विहिरींना पाणी आलले नाही म्हणून पुढील हंगाम पाण्यावाचून शेती करणं अवघड आहे, त्यासाठी आज खाटकी नाल्यात पाणी सोडण्यात यावे.
- सतीश बागुल, माळवाडी.