मराठा क्रांती मोर्चासाठी गावोगावी बैठका

By Admin | Published: September 21, 2016 11:30 PM2016-09-21T23:30:39+5:302016-09-21T23:31:05+5:30

सिन्नर : आज शहरात जनजागरण रॅली; मोर्चाच्या दिवशी शेतकामे बंद ठेवणार

Village meetings for the Maratha Kranti Morcha | मराठा क्रांती मोर्चासाठी गावोगावी बैठका

मराठा क्रांती मोर्चासाठी गावोगावी बैठका

googlenewsNext

सिन्नर : नाशिक येथे येत्या शनिवारी (दि. २४) काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चात सिन्नर तालुक्याचा लक्षणीय सहभाग दिसावा, यासाठी गावोगावी बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकांना मराठा समाजबांधवासह अन्य समाजाही उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे.
नियोजन समितीने पाच दिवस सिन्नर तालुक्यातील जवळपास संपूर्ण गावे पिंजून काढली. चौकाचौकात, मंदिरात व सार्वजनिक सभामंडपात सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत बैठका घेण्यात आल्या. रात्री उशीर झाला तरी गावोगावी ग्रामस्थ थांबून होते. नियोजन समितीच्या सदस्यांनी शनिवारी पार्किंग व अन्य व्यवस्थेची माहिती दिली.
शनिवार ते बुधवारपर्यंत नियोजन समितीच्या सदस्यांनी तालुक्यातील गावोगावी जाऊन बैठका घेतल्या. शनिवारी (दि. १७) सकाळी ८ वाजता कुंदेवाडी येथून दौऱ्यास प्रारंभ झाला. कुंदेवाडी, मुसळगाव, दातली, खोपडी, खंबाळे, भोकणी, सुरेगाव, मऱ्हळ, निऱ्हाळे, घोटेवाडी, वावी, पांगरी, धारणगाव व फर्दापूर येथे बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये शेकडो ग्रामस्थ सहभागी होऊन मोर्चाला उपस्थित राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
रविवारी (दि. १८) बारागावपिंप्री, सुळेवाडी, पाटपिंप्री, घंगाळवाडी, कोमलवाडी, वडांगळी, खडांगळी, चोंढी, मेंढी, सोमठाणे, सांगवी, दहीवाडी, उजनी, पंचाळे, देवपूर व कीर्तांगळी येथे, तर सोमवारी (दि. १९) मनेगाव, पाटोळे, डुबेरे, डुबेरवाडी, ठाणगाव, पाडळी, टेंभूरवाडी, हिवरे, गोंदे, नांदूरशिंगोटे, चास व नळवाडी गावांमध्ये बैठका झाल्या. मंगळवारी (दि. २०) हरसूले, सोनारी, सोनांबे, कोनांबे, शिवडे, घोरवड, पांढुर्ली, बेलू, आगासखिंड, विंचूरदळवी, वडगाव पिंगळा, चिंचोली, मोह व नायगाव, मापारवाडी, तर बुधवारी (दि. २१) रोजी दुसंगवाडी, सायाळे, मलढोण, पाथरे, कोळगावमाळ, मीरगाव, झापेवाडी, भरतपूर, कारवाडी, शहा, पुतळेवाडी, शिंदेवाडी, मिठसागरे येथे नियोजन समितीच्या सदस्यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.
माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, हरिभाऊ तांबे, राजाराम मुंगसे, पंकज जाधव, राजाराम मुरकुटे, मयूर खालकर, स्वप्नील डुंबरे, पांडुरंग वारुंगसे, बाळासाहेब उगले, राजेंद्र घोरपडे, अमित मुदबखे, राजू चव्हाणके, देवेंद्र आवारे, गणेश उगले, मयूर गाडे, अक्षय कानडी, वसंत बरकले, संजय चव्हाणके, जयराम शिंदे, मनोज शिरसाट, सुनील अनवट, राजेंद्र घुमरे, विजय काटे, सचिन उगले यांच्यासह नियोजन समितीचे सदस्य यासहभागी झाले होते. मोर्चाचा उद्देश गावोगावच्या बैठकांमध्ये नागरिकांना समजावून सांगण्यात आला. (वार्ताहर)

शेतकामे बंद ठेवून मोर्चात सहभागी होणार

नाशिक येथे मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनासाठी नियोजन समितीने गावोगावी बैठका घेतल्या. पाडळी, ठाणगाव, टेंभूरवाडी, हिवरे येथील बैठकीत शेतकऱ्यांनी शनिवारी शेतकामे बंद ठेवून मोर्चात सहभागी होण्याचे आश्वासन दिले. बैठकीत मोर्चाचा उद्देश, समाजाचे प्रश्न यावर चर्चा करण्यात येऊन कोपर्डी घटनेचा निषेध करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. गावपातळीवर समिती गठित करण्याचा निर्णय गावोगावच्या बैठकीत घेण्यात आला. मोर्चा शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाच्या दिवशी संपूर्ण गाव बंद ठेवून सहभाग नोंदविण्याचा निर्धार कोनांबे केला. दुकाने, शेतकामांसह अन्य कामे बंद ठेवून शनिवारच्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार कोनांबेकरांनी व्यक्त केला.

शनिवारी शाळेला सुटी
सिन्नर येथील माध्यमिक लोकशिक्षण मंडळाने शनिवारी मराठा क्रांती मोर्चात जास्तीत जास्त समाजबांधवांना सहभागी होता यावे, यासाठी सर्व शाखा व कनिष्ठ महाविद्यालयास सुटी जाहीर केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब गडाख यांनी ‘लोकमत’ला दिली. जास्तीत जास्त समाजबांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन गडाख यांनी केले आहे.

आज सिन्नरला जनजागरण रॅली
नाशिक येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी सिन्नर शहरात जनजागृती होण्यासाठी आज गुरुवार (दि. २२) रोजी शहरात जनजागरण मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेनऊ वाजता गंगावेस येथून रॅलीस प्रारंभ होणार असून महिला व पुरुष या मोटारसायकल रॅलीत सहभागी होणार आहेत. भगवा ध्वज आपल्या मोटार सायकलला बांधून उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. तळवाडी, भैरवनाथ सोसायटी, रेणुकानगर, त्रिशुळी, खर्जेमळा, कानडीमळा, गणेशनगर, शंकरनगर, विजयनगर, संगमनेर नाका, बसस्टॅण्ड, शिवाजीनगर, झापवाडी, सरदवाडी, वृंदावननगर, संजीवनीनगर, उद्योगभवन, आडवाफाटा, नाशिकवेस, लालचौक, गंगावेस, खडकपुरा, व्यापारी बॅँक, लालचौक, भिकुसा कॉर्नर, शिवाजीचौक, लोंढेगल्ली, कुरणे गल्ली, तानाजी चौक, नेहरुचौक, गणेशपेठ या मार्गे जाणार असून शिवाजी चौकात मोटारसायकल रॅलीची सांगता होणार आहे.

 

Web Title: Village meetings for the Maratha Kranti Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.