जंगलातील पाण्याचे श्रोत आटल्याने ेबिबट्या पाण्याच्या शोधार्थ गावाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 06:13 PM2018-12-05T18:13:51+5:302018-12-05T18:15:28+5:30

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस परिसरातील कसाड शिवारात बिबट्याचा उपद्रव वाढला असून काल रात्री बिबट्याने गिरणा नदी काठालगत असलेल्या कसाड मळा शिवारातील शेतकरी समाधान आहेर या शेतकºयाच्या घरालगत असलेल्या खळ्यातुन शेळी चा फडशा पाडून उसाच्या शेतात नेऊन फस्त केल्याची घटना मंगळवारी रात्री घडल्याने गिरणा नदीकाठ लागून असलेल्या पिळकोस ग्रामस्थांनी बिबट्याचा मोठा धसका घेतला आहे. वनविभागाने बिबट्याला पिंजरा लाऊन जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 The village is in search of drinking water from the forest | जंगलातील पाण्याचे श्रोत आटल्याने ेबिबट्या पाण्याच्या शोधार्थ गावाकडे

जंगलातील पाण्याचे श्रोत आटल्याने ेबिबट्या पाण्याच्या शोधार्थ गावाकडे

Next
ठळक मुद्देपिळकोस : शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले अनुभवाचे बोल

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस परिसरातील कसाड शिवारात बिबट्याचा उपद्रव वाढला असून काल रात्री बिबट्याने गिरणा नदी काठालगत असलेल्या कसाड मळा शिवारातील शेतकरी समाधान आहेर या शेतकºयाच्या घरालगत असलेल्या खळ्यातुन शेळी चा फडशा पाडून उसाच्या शेतात नेऊन फस्त केल्याची घटना मंगळवारी रात्री घडल्याने गिरणा नदीकाठ लागून असलेल्या पिळकोस ग्रामस्थांनी बिबट्याचा मोठा धसका घेतला आहे. वनविभागाने बिबट्याला पिंजरा लाऊन जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
परिसरात बिबट्या येण्याचे प्रमाण हे दहा वर्षापासून वाढले असून आजवर या जंगलात पाणी मुबलक असल्याने बिबट्या हा पिळकोस येथील मेंगदर, फांगदर डोंगरातील जंगलात आढळून येत होता. परंतु यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने जंगलातील पाण्याचे श्रोत पूर्णपणे आटल्यामुळे बिबट्या हा पाण्याच्या शोधार्थ नदीकाठालाकडे आल्याचे यावेळी शेतकºयांकडून सांगण्यात आले. नदीकाठ परिसरात रात्रीच्या वेळेस परिसर हा बिबट्याच्या डर्काळ्यांनी दणाणून निघत असून शेतकरी, पशुपालक व शिवारातील वास्तव्यास असलेले ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीमुळे आपले पशुधन वाचण्यासाठी रात्र जागून काढत आहेत.
पिळकोस येथील गिरणाकाठच्या कसाड शिवारातील परिसरातील बिबट्या जेरबंद करणे अत्यंत गरजेचे झाले असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कळवण तालुक्यातील मोकभनिग, विसापूर, पांढरीपाडा, भादवण, पिळ्कोस, गांगवन, धनगरपाडा हि गावे चौरंगनाथ किल्ला व देवडोंगाराच्या पायथ्याजवळील गावे असून या गावांना बिबट्याचा उपद्रव सहन करावा लागत आहे. बिबट्यामुळे परिसरातील शेकडो पशुधनाचा आजवर फडशा पडला असून शेतकरी व पशुपालक यांचे मोठ्या प्रमाणावर पशुधनाचे नुकसान झाले आहे. तरी संबंधित विभागाने परीसरात पिंजरा लावावा व परीसारतील बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी पशुपालक व शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

गावातील बहुतेक आदिवाशी बांधव हे वडिलोपार्जित शेळीपालन व्यवसाय करतात तर गावातील सर्व शेतकºयांकडे गाई, म्हशी, बैल, शेळ्या आदी जनावरे आहेत. बिबट्या कसाड परिसरात आढळून आल्याने गावातील शेळीपालन करणारे आदिवासी बांधव व शेतकरी धास्तावले असून वनविभागाने पशुधनाचा विचार करता त्वरित पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे व ग्रामस्थांना दिलासा द्यावा.
- सुनील मोतीराम जाधव,
शेतकरी व पशुपालक, पिळकोस.

Web Title:  The village is in search of drinking water from the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.