ग्रामसेवक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 11:49 PM2020-01-31T23:49:29+5:302020-01-31T23:50:18+5:30
नाशिक : मालेगाव तालुक्यातील टोकडे ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून, ज्या कामांच्या नावाने देयके काढण्यात आली ती कामेच गावात अस्तित्वात नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीच्या आधारे जिल्हा परिषदेने केलेल्या चौकशीत टोकड्याच्या ग्रामसेवक सुमित्रा पुंजाराम गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मालेगाव तालुक्यातील टोकडे ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून, ज्या कामांच्या नावाने देयके काढण्यात आली ती कामेच गावात अस्तित्वात नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीच्या आधारे जिल्हा परिषदेने केलेल्या चौकशीत टोकड्याच्या ग्रामसेवक सुमित्रा पुंजाराम गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे.
या संदर्भात ग्रामपंचायतीतील नागरिकांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी यांना निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली होती. तथापि, शासकीय पातळीवर वेळकाढूपणा केला जात असल्याने जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीसमोर उपोषण करण्याचा निर्णय घेऊन गावकऱ्यांनी १४ जानेवारीपासून उपोषण सुरू केले होते. टोकडे ग्रामपंचायतीत सन २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळात चौदावा वित्त आयोगाचा मिळालेला निधी तसेच आमदारांच्या विकासकामांच्या निधीतून कामे करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात जागेवर एकही काम अस्तित्वात दिसत नसल्याचे म्हटले आहे. त्यात प्रामुख्याने भगतसिंह सभा मंडप, संगणक कक्ष, चौक सुशोभीकरणाचे एकही काम झालेले नसताना लाखो रुपयांची देयके अदा करण्यात आली आहेत. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गावात ३२६ शौचालये बांधून ३९ लाख रुपये खर्च झाल्याचे दाखविले जात असताना त्यापैकी फक्त ५० शौचालयांचा वापर सुरू असून, बºयाच शौचालयांना टाक्या नाहीत, काहींना दरवाजे व भांडेदेखील बसविण्यात आलेले नाहीत. त्याचबरोबर एकाच कुटुंबातील व्यक्तींना दोन दोन घरकुले वाटप करण्यात आले असून, गावात करण्यात पाइपलाइनमध्येदेखील गैरव्यवहार झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. इतर संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून, अपहाराची रक्कम वसूल करेपर्यंत उपोषण करण्यावर ग्रामस्थ ठाम असल्याचे विठोबा द्यानधान, वसंत शेजवळ, विजयसिंग डिंगर, नितीन सूमराव, जव्हारसिंग संगेडा, हेमंत फरस, नितीन डिंगर, सोपान सुमराव, भगवान रंगी यांनी सांगितले. अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपजिल्हा परिषदेने या तक्रारींची दखल घेत मालेगावचे उपअभियंता व मालेगाव पंचायत समितीच्या विस्तार अधिकाºयांना चौकशीचे आदेश दिले होते, परंतु चौकशी करणारे अधिकारीदेखील जिल्हा परिषदेचे असल्यामुळे ते दोषींना वाचवित असल्याचा आरोप करून त्रयस्थ समितीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तत्पूर्वी जिल्हा परिषदेने केलेल्या चौकशीत ग्रामसेवक सुमित्रा गायकवाड या दोषी आढळल्याने बुधवारी गट विकास अधिकाºयांनी त्यांना निलंबित केले आहे.