ग्रामसेवकांचा सरकारविरोधात असहकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:52 AM2019-08-11T00:52:41+5:302019-08-11T00:56:12+5:30
पेठ : शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसेवक संघटनेने आॅगस्ट क्रांती दिनापासून शासनविरोधात असहकार आंदोलन सुरू केले असून, जनतेशी संबंधित कामकाज सुरू राहणार असले तरी शासकीय बैठका, अहवाल सादर करणे या कामांवर काम बंद आंदोलन छेडले आहे.

पेठ तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे, ग्रामसेवकांना पंचायत विकास अधिकारी असे पद निर्माण करावे, २००५ नंतर सेवेत आलेल्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन लागू करावी, अतिरिक्त कामे करणे, आगाऊ वेतनवाढ मंजूर करणे, शासन नियमानुसार प्रवासभत्ता लागू करणे आदी मागण्यांसाठी असहकार आंदोलन छेडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष बाळू खंबाईत, सचिव बाळासाहेब मगर, प्रवीण सुरसे, भूषण लोहार, दिलीप भुसारे, सचिन नेहते, नामदेव गावित, योगेश सांगळे, सुवर्णा पाटील व मोहिनी दळवी यांच्यासह तालुक्यातील ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.