खरीप हंगामासंदर्भात गावोगावी होणार मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:14 AM2021-05-24T04:14:21+5:302021-05-24T04:14:21+5:30
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आणि संचारबंदीच्या परिस्थितीत खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पिके, खते, बियाणे, पेरणी, मशागत आदी शेतीविषयक ...
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आणि संचारबंदीच्या परिस्थितीत खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पिके, खते, बियाणे, पेरणी, मशागत आदी शेतीविषयक विषयांवर मार्गदर्शन करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने २३ व २४ मेदरम्यान शेतीविषयक विविध विषयांवर मार्गदर्शन करण्याचे नियोजित केले आहे.
खरीप हंगामपूर्व नियोजनात भातलागवड तंत्रज्ञान, चारसूत्री भात लागवड तंत्रज्ञान, एकात्मिक कीड व्यवस्थापन, गटशेती, मूलस्थानी जलसंधारण, प्रधानमंत्री पीक विमा योजना, फलोत्पादन, समूह आधारित कृषि विस्तार कार्यक्रम , मृदा चाचणी व जमीन आरोग्यपत्रिका, टोळधाड नियंत्रण, खरीप पिकांची बीजप्रक्रिया, १० टक्के खतांची बचतबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. शेतकरीबांधवांनी गावोगावी होणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांनी केले आहे.