सांगवी येथेही लोकप्रतिनिधींना गावबंदीचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 05:18 PM2018-09-16T17:18:14+5:302018-09-16T17:18:55+5:30
उमराणे : चणकापुर झाडी एरंडगाव वाढीव कालव्याच्या रखडलेल्या कामाविषयी सांगवी (ता.देवळा )येथील ग्रामस्थांनीही लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना गावबंदी तसेच आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ठराव केला आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून देवळा तालुक्याच्या पुर्व भागातील गावात चणकापुर झाडी एरंडगाव कालवा पुर्णत्वाविषयी जनता आक्र मक झाली असुन तिसगाव पाठोपाठ आता सांगवी गावानेही लोकप्रतिनिधींना गावबंदीचा ठराव केल्याने हा प्रश्न अधिकच तीव्र होत चालला आहे. ठरावावर हरसिंग ठोके, मिलींद शेवाळे, उत्तम ठोके, दिनेश अहिरे, रुपेश व्हलगडे, कौतिक अहिरे, विजय अहिरे, संजय चव्हाण, दिपक ठोके, सिकंदर बस्ते, देविदास अहिरे, संदीप पवार, महेंद्र शेवाळे, साहेबराव बस्ते, वामन ठोके, दिपक अहिरे आदिंसह बहुतांश ग्रामस्थांच्या सह्या आहेत.