टाकेद येथे दोन रूग्ण सापडल्याने गाव चौदा दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 06:16 PM2020-06-20T18:16:07+5:302020-06-20T18:16:58+5:30
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील टाकेद येथे दोन कोरोणा बाधित रु ग्न सापडल्याने स्वंयस्पुर्तीने चौदा दिवस गाव ...
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील टाकेद येथे दोन कोरोणा बाधित रु ग्न सापडल्याने स्वंयस्पुर्तीने चौदा दिवस गाव बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सरपंच ताराबाई बांबळे व उप सरपंच रामचंद्र परदेशी यांनी दिली.
टाकेद ही परिसरातील मुख्य बाजारपेठ असल्याने परिसरातून मोठ्या प्रमानात गिर्द होत असते. बुधवारचा बाजार ग्रामपंचायतने मार्च मिहण्यापासुनच बंद केला आहे. तसेच दररोज सकाळी आठ ते सांयकाळी चार वाजे पर्यंत दुकाणे चालु असतात व भाजीपाला व फळफळावळची दुकाणे ग्रामपंचायतने गावाबाहेर ठेवली आहेत. या काळात गावात वेळोवेळी निरजंतुकीकरणही करण्यात येत होते तरी सुध्दा दोन पैकी रु ग्ण सापडल्याने गावात घबराट पसरली आहे.
बाधित रूग्ण कळताच शुक्र वारी (दि.१९) दुपारीच प्राथमिक आरोग्य केंद्र खेडचे डॉ. पी. आर. गुप्ता, सुपरवायझर डी. एम. देशमुख, आरोग्य सेविका भारती सोनवणे, आरोग्य विभागाच्या आशा व अंगणवाडी सेविका ग्रा. प. सदस्य व ग्रामविकास अधिकारी शिवाजी भामरे तसेच रतन बांबळे व ग्रामस्थांनी मिटिंग घेऊन पुर्ण गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच शनिवारी (दि.२०) तालुका आरोग्य अधिकारी व बी. डी. ओ. किरण जाधव यांनी चौदा दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. गावात कुणीही घरातुन बाहेर जाऊ नये व कुणालाही घरात घेऊ नये अशा सुचना देण्यात आल्या.
बाधित रूग्णाच्या संपर्कात जे जे नागरिक आले होते अशा सुमारे शंभर व्यक्तींना तपासण्यात आले व शनिवारीही टाकेद येथिल आरोग्य उप केंद्रात जे जे बाधित रु ग्णांच्या संपर्कात आले त्यांची तपासणी करण्यात आली. तसेच गावात फवारणी केली व उद्याही पुर्ण गाव निर्जंतुक करणार आहेत.
नागरिकांनी स्वताची योग्य ती काळजी घ्यावी सुरक्षित अंतर पाळावे व मास्क घातल्याशिवाय कुठेही फिरु नये असे आवाहन सरपंच ताराबाई बांबळे, उप सरपंच रामचंद्र परदेशी व ग्रा. प. सदस्य यानीं केले आहे.