शेतीमाल विक्रीसाठी गावनिहाय गट करण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:14 AM2021-05-13T04:14:59+5:302021-05-13T04:14:59+5:30
यासंदर्भात काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या काळात बाजार समित्यांचे कामकाज पूर्णपणे बंद राहील. ज्या शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकावयाचा ...
यासंदर्भात काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या काळात बाजार समित्यांचे कामकाज पूर्णपणे बंद राहील. ज्या शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकावयाचा आहे त्यांची बाजार समितीने नोंदणी करून विकेंद्रित पध्दतीने व्यवस्था करून द्यावी. बाजार समितीच्या अधिकृत व्यापाऱ्यांच्या खळ्यावर बाजार समितीच्या अधिकृत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण होईल. व्यापाऱ्याकडे दैनंदिन होणारी आवक आणि दर यांची नोंद ठेवण्यात यावी. या सर्व काळात कोरोना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधीत व्यापारी आणि बाजार समित्यांची, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्व बाजार समित्यांवर देखरेखीसाठी तालुका सहायक उपनिबंधकांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून हे अधिकारी नियमितपणे बाजार समितीला भेट देऊन सर्व कामकाजाचा आढावा घेणार आहेत. नाशिक बाजार समितीसाठी उपनिबंधक फैयाज मुलाणी, तर लासलगाव बाजार समितीसाठी निफाडचे सहायक उपनिबंधक अभिजित देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.