विद्युतपंप चोरणाऱ्या तिघांना ग्रामस्थांनी पकडले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 06:33 PM2018-11-11T18:33:06+5:302018-11-11T18:33:26+5:30
चांदवड तालुक्यातील पन्हाळे परिसरात विहिरीवरील वीजपंप चोरणाºया तिघांना ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले व चांदवड पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडून विद्युतपंपासह चार किलो तांब्याच्या तारी, वायर व इतर साहित्य जप्त केले आहे.
चांदवड : तालुक्यातील पन्हाळे परिसरात विहिरीवरील वीजपंप चोरणाºया तिघांना ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले व चांदवड पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडून विद्युतपंपासह चार किलो तांब्याच्या तारी, वायर व इतर साहित्य जप्त केले आहे. दरम्यान, संशयित तिघांना चांदवडचे न्यायाधीश के.जी. चौधरी यांच्या समोर उभे केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
पन्हाळे येथील शेतकरी राजेंद्र शिवाजी सोनवणे हे गुरुवारी (दि. ८) रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातील विहिरीकडे गेले तर त्यांना चार-पाच अज्ञात व्यक्ती भ्रमणध्वनीच्या प्रकाशात मोटारसायकलवर काहीतरी ठेवताना दिसले. त्यांनी परिसरातील नागरिकांना माहिती दिली. ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली असता चोरट्यांनी दुचाकीवरून पन्हाळे-काजीसांगवी रस्त्याने पळ काढला. ग्रामस्थांनी दुचाकीचा पाठलाग करून तिघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरांकडून डिस्कव्हर मोटारसायकल (क्र.एमएच १५ डीव्ही ९९७३), वीजपंप, वायर व इतर साहित्य ताब्यात घेतले. दरम्यान, त्यांचे अन्य दोन साथीदार दुसºया मोटारसायकलवरून पळून जाण्यात यशस्वी ठरले.
याबाबत शेतकरी राजेंद्र सोनवणे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. पोलिसांनी वीजपंप चोरणाºया अजय शिवाजी खरे (२१) , समाधान शिवाजी खरे (२३, रा. पन्हाळे, सुनील नाना गुंजाळ (२३, रा. विटावे) या तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला. संशयितांनी परिसरातील अनेक वीजपंप व कांदा चोरी केल्याची कबुली दिली. त्यांना न्यायालयात हजर केले असता संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कैलास जगताप करत आहेत.