नाणेगावी रेल्वेच्या विरोधात ग्रामस्थांची घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:18 AM2021-06-09T04:18:35+5:302021-06-09T04:18:35+5:30
नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी सोमवार सात जूनपासून जागेच्या संपादनासाठी मोजणी करण्यासाठी रेल्वेचे कर्मचारी नाणेगावला येणार होते. मात्र चार, पाच दिवसांपूर्वी ...
नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी सोमवार सात जूनपासून जागेच्या संपादनासाठी मोजणी करण्यासाठी रेल्वेचे कर्मचारी नाणेगावला येणार होते. मात्र चार, पाच दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव देत विरोध असल्याचे जिल्हाप्रशासनासह, रेल्वे प्रशासनाला विरोधाबाबत पत्रव्यवहार केला होता. रेल्वेचे अधिकारी मोजणीसाठी येणार असल्याचे पाहून सोमवारी सकाळपासूनच संसरी, बेलतगव्हाण, शेवगेदारणाचे ग्रामस्थ नाणेगाव येथे जमले होते. तर पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. सकाळी अकरा वाजेदरम्यान नाणेगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर बाधित शेतकऱ्यांनी एकत्रितपणे रेल्वे प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या. यावेळी अशोक आडके, शरद पाळदे, विलास आडके, ज्ञानेश्वर शिंदे, ज्ञानेश्वर काळे, राजाराम शिंदे, कैलास आडके, वासुदेव पोरजे, मोहन आडके, योगेश काळे,संजय आडके आदी उपस्थित होते. (फोटो डेस्कॅनवर)