दरेवाडीचे ग्रामस्थ करणार मूळ जागेवर झेंडावंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 05:39 PM2019-01-17T17:39:55+5:302019-01-17T17:40:53+5:30

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नव्याने झालेल्या भाम धरणाच्या परिसरातील प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या पुर्नवसनाच्या अडचणी अद्याप सोहविण्यात न आल्याने दरेवाडीच्या संतप्त प्रकल्पबाधितांनी २६ जोनेवरी रोजी सदरच्या मुळ जागेवर घषंडावंदन करण्याचा इरादा व्यक्त केला आहे.

The villagers of Darewadi flutter in the original place | दरेवाडीचे ग्रामस्थ करणार मूळ जागेवर झेंडावंदन

दरेवाडीचे ग्रामस्थ करणार मूळ जागेवर झेंडावंदन

googlenewsNext
ठळक मुद्देइगतपुरी : प्रकल्पबाधितांचा पुर्नवसनाकरीता आक्र मक पवित्रा

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नव्याने झालेल्या भाम धरणाच्या परिसरातील प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या पुर्नवसनाच्या अडचणी अद्याप सोहविण्यात न आल्याने दरेवाडीच्या संतप्त प्रकल्पबाधितांनी २६ जोनेवरी रोजी सदरच्या मुळ जागेवर घषंडावंदन करण्याचा इरादा व्यक्त केला आहे.
सदर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न नवीन वर्षात तरी सुटतील अशी आशा होती, मात्र इगतपुरी तालुका तहसील प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठवून डिसेंबर अखेर पर्यंत प्रश्न मार्गी लावू असे लेखी आश्वासन देऊनही अद्याप पुनर्वसनाच्या कुठल्याही हालचाली दिसत नसल्यामुळे संतप्त झालेल्या दरेवाडी ग्रामस्थानी प्रजासत्ताक दिनी आपल्या मूळ जागेत झेंडावंदन करून तिथेच पुन्हा राहण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन ग्रामस्थानी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुनर्वसन अधिकारी, इगतपुरी तहसीलदार व पोलीस प्रशासनाकडे दिले आहे. यामुळे पुन्हा एकदा भाम धरणग्रस्त नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते येथे पंतप्रधान सिंचन योजनेतून सुमारे अडीच टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणाच्या प्रारंभीपासून येथील प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचा मूळ प्रश्न शासनाकडून सोडविण्यात आलेला नाही. या धरणामुळे संपूर्ण दरेवाडी बाधित होऊन ग्रामस्थांची शंभर टक्के घरे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे प्रशासनाने या नागरिकांना तात्पुरते शेड उभारून कसे बसे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला असला तरी तो दरेवाडीकरांना मान्य नाही.
नवीन हक्काच्या जागेत कायमस्वरूपी सर्व सोयीसुविधायुक्त जागेत पुनर्वसन करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा शासनाकडे आपली कैफियत मांडली. कित्येकदा अर्ज, विनंत्या ही करण्यात आल्या मात्र कुणीही दखल घेतली नाही. म्हणून गेल्या १० डिसेंबर रोजी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून इगतपुरीच्या तहसील कार्यालयावर संतप्त प्रकल्पबाधित नागरिकांनी आपला बिºहाड मोर्चा काढून मूळ मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी तहसीलदार वंदना खरमाळे व संबंधित अधिकारी यांनी लेखी उत्तर देऊन डिसेंबर अखेर शासनाकडे प्रस्ताव पाठवून प्रकल्पबाधितांचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र जानेवारीचा पंधरवाडा उलटून गेला तरी कसलीही दाद मिळत नसल्याचे बघून पुनर्वसनाची आस लावून बसलेल्या बाधित दरेवाडीकरांवर शासनाच्या व प्रशासनाच्या नाकर्ते पणामुळे पून्हा आपल्या मूळ जागेवर राहण्याची वेळ आली आहे. या मूळ ठिकाणी तुटलेली घरे, पडलेल्या भीती व पाणी असून जर या ठिकाणी काही बरेवाईट घडून धोका निर्माण झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील असा इशारा निवेदनात देण्यात आलेला आहे. यामुळे इगतपुरी प्रशासनाची धावपळ उडाली आहे.
या निवेदनावर शांताराम भगत, सीताराम गावंडा, बाळू गावंडा, अरु ण गावंडा, गणपत गावंडा, साईनाथ गावंडा, यशवंत पारधी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
----------------
शासनाने या धरणाची निर्मिती करतेवेळी प्रकल्पात गेलेल्या आदिवासी नागरीकांच्या जमिनीचा मोबदला देण्यात कसर केली आहे. अशी नागरिकांची तक्र ार आहे. शिवाय गत वर्षी भाम धरणात प्रथमच पाणी साठवले गेले. पुनर्वसनाच्या अटी शर्थी पूर्णपणे शसनाकडून पाळल्या गेल्याच नाही तर मग अधिकारी लोकांनी पाणी साठा करण्याची घाई का केली? असा सवाल उपस्थित झाला आहे.
प्रथम र्पुावसन मगच पाणी हे धोरण शासनाकडून पाळण्यात आलेले नाही. संपूर्ण दरेवाडी बाधित असतांना पावसाळ्यात नागरिकांना गळक्या शेडमध्ये रहावे लागलेले आहे.
----------------
निवेदनाची प्रत. (फोटो १७ निवेदन)

Web Title: The villagers of Darewadi flutter in the original place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.