मुळवडच्या वळण गावात ग्रामस्थ विजेवाचुन वंचित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 06:21 PM2020-08-12T18:21:52+5:302020-08-12T18:22:19+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील मौजे मुळवड ग्रामपंचायत हद्दीतील वळण या छोट्या गावातील बहुतेक घरातील सर्व ग्रामस्थ आपापल्या शेतात घरे बांधुन वसाहतीने राहतात. हेतु एकच की, वर्षाचे धान्य पिकवणे त्याची राखण करणे. तसेच सिझन प्रमाणे बाराही महिने शेतात काही ना काही पिके काढत त्यापासून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न असतो, त्यादृष्टीने राहत्या वस्तीत नागरी सुविधा मिळण्यासाठी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.
लोकमत न्युज नेटवर्क

ग्रामपंचायत मुलवड पैकी वळण या गावातील शेतकरी गेल्या ४/५ वर्षापासून सर्व कुटूंबा सहीत शेतावर राहत असून त्यांना कुठलीच लाईट सोय नसून सर्व कुटूंबे अंधारातच वास्तव्य करु न आहेत. याबाबतचे वास्तव आमदार हिरामण खोसकर यांना एका निवेदनाद्वारे दिले आहे. त्यांच्या माध्यमातून तरी आम्हाला अंधारातून प्रकाशा कडे घेवुन चला. यासाठी हे निवेदन दिले आहे. त्यात असेही म्हटले हे की. स्वातंत्र्य मिळुन ७३ वर्षांचा काळ लोटला आहे. आम्ही अंधारातच चाचपडतो आहोत. या जंगलात प्राणी, पशु, पक्षी आदींचे वास्तव्य असते. त्यांच्यापासून शेतकरी व त्याच्या कुटुंबियांना सतत धोका असल्यामुळे काही ठिकाणी विजेची व्यवस्था केली तर निदान घराबाहेर विजेचा बल्ब तरी लावता येईल. ग्राम पंचायतीला स्ट्रीटलाईट लावता येईल. रात्रीच्या वेळी-अवेळी कोणतीही गरज भासल्यास तेथे विद्युत लाईट असणे गरजेचे आहे. विज वितरणाची व्यवस्था करावी अशी विनंती केली आहे. या निवेदनावर रघुनाथ घाटाळ, लाडकू घाटाळ, रामदास घाटाळ, वसंत घाटाळ, पांडू घाटाळ, रामजी नेवळ, दलू पिठोले, तुळशीराम राऊत, काकडू राऊत, भिवा पिठोले, रघुनाथ घाटाळ आदींच्या स्वाक्षरी आहेत.