ग्रामस्थांची धुळवड, विक्रेत्यांची परवड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 09:50 PM2020-03-10T21:50:52+5:302020-03-10T21:52:05+5:30

वणी : मंगळवारचा आठवडे बाजार आणि त्यात ग्रामीण भागात महत्त्वपूर्ण सण मानला जाणाऱ्या धुळवड असल्याने विक्रेत्यांची परवड झाली. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. ग्राहकांअभावी आर्थिक उलाढाल ठप्प झाली.

Villagers Dholvad, Sellers Affordable! | ग्रामस्थांची धुळवड, विक्रेत्यांची परवड !

वणी येथील आठवडे बाजारात असलेला शुकशुकाट.

googlenewsNext
ठळक मुद्देशुकशुकाट : ग्राहकांअभावी उलाढाल ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : मंगळवारचा आठवडे बाजार आणि त्यात ग्रामीण भागात महत्त्वपूर्ण सण मानला जाणाऱ्या धुळवड असल्याने विक्रेत्यांची परवड झाली. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. ग्राहकांअभावी आर्थिक उलाढाल ठप्प झाली.
येथील आठवडे बाजार मंगळवारी ंैभरतो. बाजारात आज शुकशुकाट असल्याने व्यावसायिक ग्राहकांची प्रतिक्षा करत होते. या आठवडे बाजाराचा सुमारे शंभर गावांशी व्यावसायिक संबध एकमेकांशी यानिमित्त येतो. सर्व प्रकारचे व्यावसायिक त्यात भाजीपाला धान्य किराणा कपडे, हॉटेल्स, भेळभत्त्याची दुकाने, पादत्राणे विक्रेते, मसाला भांडे, चैनीच्या वस्तु विक्रेते या व अशा विविध स्वरुपाचे व्यावसायिक आपली दुकाने बाजारात लावतात.आर्थिक व्यवहार थंडावले विक्रेते आठवडेबाजाराच्या उलाढालीतुन आठ दिवसाचा खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ लावतात. येथील बाजाराचे स्वरूप मोठे असते. आर्थिक ऊलाढालही मोठी असते मात्र आज धुळवड असल्याने हा उत्सव साजरा करणारे लोक बाजारात आलेच नाही. त्यामुळे भाजीपाला वगळता उर्वरित दुकानांमधे ग्राहकांअभावी शुकशुकाट जाणवत होता. त्यामुळे आर्थिक व्यवहार थंडावल्याचे जाणवत होते.

Web Title: Villagers Dholvad, Sellers Affordable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.