रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी रस्त्यावरच केले वृक्षारोपण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 05:38 PM2018-05-02T17:38:22+5:302018-05-02T18:37:53+5:30
येवला तालुक्यातील पाटोदा गटातील सर्वच रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यांची दुरुस्ती करावी यासाठी ग्रामस्थ पाठपुरावा करीत आहे मात्र या मागणीला अधिकारी वर्गाने तसेच लोकप्रतिनिधी देखील लक्ष देत नसल्याने याचा निषेध म्हणून पाटोदा येथील ग्रामस्थांनी पाटोदा पिंपळगाव लेप या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष उस्मान शेख उपसरपंच साहेबराव बोराडे यांच्च्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण करूनयात करण्यात येऊन संबधित खात्याचा तसेच लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यात आला .
नाशिक - येवला तालुक्यातील पाटोदा गटातील सर्वच रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यांची दुरुस्ती करावी यासाठी ग्रामस्थ पाठपुरावा करीत आहे मात्र या मागणीला अधिकारी वर्गाने तसेच लोकप्रतिनिधी देखील लक्ष देत नसल्याने याचा निषेध म्हणून पाटोदा येथील ग्रामस्थांनी पाटोदा पिंपळगाव लेप या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष उस्मान शेख उपसरपंच साहेबराव बोराडे यांच्च्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण करूनयात करण्यात येऊन संबधित खात्याचा तसेच लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यात आला .आंदोलन करूनही या गटातील रस्त्यांच्या कामांना मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामाला प्रारंभ न केल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता येवला पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
पाटोदा हे परिसरातील गावांचे मुख्यबाजारपेठेचे ठिकाण आहे मात्र या गावाला जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे त्यामुळे दळण वळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे पाटोदा ते पिंपळगाव लेप पाटोदा ते आडगाव रेपाळ, कातरणी मुरमी,पाटोदा ते विखरणी पुढे विसापूर कातरणी पाटोदा ते दहेगाव, पाटोदा ते शिरसगाव वळदगाव या सह सर्वचरस्त्यांची अतिशय दैनावस्था झाली आहे या सर्वच मार्गावर संपूर्ण रस्त्यांवर मोठमोठी खड्डे निर्माण झाली आहेत या सर्वच रस्त्यांची दुरुस्ती करून दळण वळणाचा प्रश्न सोडवावा या साठी प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू केला मात्र संबधित अधिकारी व लोकप्रतिनिधीनाही हा महत्वाचा प्रश्न सोडविण्यास दुर्लक्ष केल्याने निषेध म्हणून पाटोदा पिंपळगावलेप या रस्त्यांवर वृक्षारोपण करण्यात येऊन निषेध करण्यात आला . या वृक्षारोपण आंदोलन प्रसंगी उस्मान शेख,उपसरपंच साहेबराव बोराडे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप बोराडे,सुर्यकांत गोसावी,युसुफ नाईकवाडी,माजी ग्रामपंचायत सदस्य संपत बोरनारे,शिवाजी वाघ,ज्ञानेश्वर कुंभारकर,साहेबराव निर्मळ,लाखां पगारे,शशिकांत पगारे,संजय जाधव,बाबासाहेब भुसारे,रेवणनाथ जाधव,भास्कर निर्मळ,सुभाष निर्मळ,बालम देशमुख,इम्तियाज देशमुख,गोरख निर्मळ,संजय कुऱ्हाडे,अहमद शहा,आण्णा शिंदे,मुनिरबाबा देशमुख,नईम देशमुख,नामदेव भोकनळ, नवनाथ निर्मळ,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पाटोदा जिल्हा परिषद गटातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे याबाबत वारंवार मागणी करूनही जनतेच्या या महत्वाच्या प्रश्नाकडे सर्वांनीच डोळेझाक करून दुर्लक्ष केल्याने तसेच प्रशासनाला या वृक्षारोपण करण्याबाबत इशारा देऊनही याची दाखल घेतली गेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र दिनी पाटोदा ते पिंपळगाव लेप या रस्त्यावरील खड्यात वृक्षारोपण करण्यात येउन निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
- उस्मान शेख, पाटोदा