ग्रामस्थांनी धरले गटविकास अधिकाºयांना धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:53 AM2017-09-01T00:53:43+5:302017-09-01T00:53:55+5:30

देशमाने बु।। येथील अंगणवाडीचा दरवाजा अंगावर पडून दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याने ग्रामपंचायत प्रशासन तसेच पंचायत समितीच्या ढिसाळ प्रशासनाविरुद्ध संतप्त पालक-ग्रामस्थांनी दुर्घटनास्थळी भेट देण्यास आलेल्या गटविकास अधिकाºयांना धारेवर धरले.

The villagers hold the block development officer | ग्रामस्थांनी धरले गटविकास अधिकाºयांना धारेवर

ग्रामस्थांनी धरले गटविकास अधिकाºयांना धारेवर

Next

देशमाने : देशमाने बु।। येथील अंगणवाडीचा दरवाजा अंगावर पडून दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याने ग्रामपंचायत प्रशासन तसेच पंचायत समितीच्या ढिसाळ प्रशासनाविरुद्ध संतप्त पालक-ग्रामस्थांनी दुर्घटनास्थळी भेट देण्यास आलेल्या गटविकास अधिकाºयांना धारेवर धरले.
बुधवारी अंगणवाडीचा दरवाजा अंगावर पडून दोन विद्यार्थ्यांना गंभीर इजा झाल्याची घटना घडली होती. या घटनेची दखल घेत गुरुवारी गटविकास अधिकारी सुनील अहिरे, सहायक गटविकास अधिकारी भाऊसाहेब अहिरे, नवनाथ काळे, प्रकाश वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता अंगणवाडीची दुर्दशा समोर आली. ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभारासंबंधी नाराजी व्यक्त करत ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यास सांगितले. यात विषय फक्त अंगणवाडीचा असताना सरपंच शिवाजी शिंदे तसेच विद्यमान सदस्यांत बसविण्यात आलेल्या सीएफएल बल्ब खरेदी बिलावरून जुंपली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच विमालबाई शिंदे होत्या. उपसरपंच भारत बोरसे, सदस्य आप्पासाहेब शिंदे, शिवाजी शिंदे बाळासाहेब पवार, मंदा वाघ, बेबी पवार, मुख्याध्यापक पुंडलिक अनारसे, मुख्याध्यापक नीलम घोडेकर, अंगणवाडी सेविका पूजा भालके, सिंधू काळे, मंगल जगताप, अंगणवाडी मदतनीस सुनीता तळेकर उपस्थित होत्या. सायंकाळी ५ वाजता पंचायत समिती सभापती आशा साळवे यांनीही घटनास्थळी भेट देऊन मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली. अधिकारी वर्गाने केवळ पाहणीचा फार्स केला; मात्र घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता दोषींवरील कार्यवाहीबाबत मौन बाळगले याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Web Title: The villagers hold the block development officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.