रस्ता प्रश्नावर ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 05:52 PM2020-06-22T17:52:09+5:302020-06-22T17:54:11+5:30
पेठ : तालुक्यातील उस्थळे पैकी वडपाडा ते बेहेडमाळ दरम्यान झालेल्या रस्ता कामात मोठया प्रमाणावर दिरंगाई व कामाची गुणवत्ता निकृष्ट असल्याचा आरोप करत परिसरातील नागरिकांनी सार्वजानिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरच अन्नत्याग आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : तालुक्यातील उस्थळे पैकी वडपाडा ते बेहेडमाळ दरम्यान झालेल्या रस्ता कामात मोठया प्रमाणावर दिरंगाई व कामाची गुणवत्ता निकृष्ट असल्याचा आरोप करत परिसरातील नागरिकांनी सार्वजानिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरच अन्नत्याग आंदोलन केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या २ किमी रस्ता कामासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण करून काम सुरू करण्यात आले मात्र ठेकेदार व प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे रस्त्याचे काम अपूर्ण वस्थेत असल्याने दळणवळणाच्या सोयीऐवजी गैरसोयच अधिक झाल्याने वारंवार तक्र ारी अर्ज व निवेदने देऊनही दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांनी थेट कार्यालयासमोरच अन्नत्याग आंदोलन केले. यामध्ये जनार्दन भूसारे, प्रभाकर खेत्री, खंडू गावीत, दिलीप राऊत, राजेंद्र गावीत यांचे सह ग्रामस्थ सहभागी झाले होते.
दरम्यान याबाबत पंचायत समिती सभापती विलास अलबाड, संचालक शाम गावीत, सदस्य तुळशिराम वाघमारे, नंदू गवळी, सुरेश पवार आदींनी उपअभियंता कोरके यांची भेट घेऊन तोडगा काढत नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन अपूर्ण काम पुर्ण करून देण्यासंदर्भात आंदोलकांना आश्वासन दिल्याने दुसºया दिवशी आंदोलन संपवण्यात आले. रस्त्याच्या प्रारंभी व शेवटी अशा दोन्ही ठिकाणी वनविभागाच्या परवानगीची आवश्यकता असून त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान ठेकेदारास कामापेक्षा अधिकचे अनुदान अदा करण्यात आले नसून वन विभागाची परवानगी मिळाल्यावर उर्वरीत काम पुर्ण करण्यात येणार असल्याचे उपअभियंता कोरके यांनी सांगितले.