इगतपूरी तालुक्यातील ग्रामस्थांनी आदिवासींना दिली मायेची ऊब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 01:34 PM2020-12-15T13:34:55+5:302020-12-15T13:36:01+5:30
नांदूरवैद्य : यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत पडलेल्या अवकाळी पावसामुळे सध्या इगतपुरी तालुक्यात थंडीची लाट उसळली असून तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या कातकरी बांधवांचे या थंडीपासून रक्षण करण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ पुढे सरसावले आहेत. बारशिंगवे, धानोशी, मायदरा, सोनोशी आदी भागातील कातकरी बांधवांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले आहे.
इगतपुरी तालुक्यात असलेल्या आदिवासी अतिदुर्गम भागातील धानोशी, मायदरा सोनोशी, बारशिंगवे येथील रहिवासी व रस्त्यावर राहत असलेल्या गरजू नागरिकांना परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पिंपळगाव डुकरा येथील सरपंच भगवान वाकचौरे, सरपंच गणेश टोचे, मायदरा, धानोशीचे सरपंच साहेबराव बांबळे, सोनोशीचे सरपंच दिलीप पोटकुले, बारशिंगवेचे सरपंच वसंत बोराडे, शिवसेनेचे गटातील गटनेते साहेबराव झनकर, सामाजिक कार्यकर्ते गणपत धोंगडे आदींसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.