गावठी दारू भट्ट्यांवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 01:16 AM2017-08-26T01:16:59+5:302017-08-26T01:17:05+5:30

गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जायखेडा पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी धाडी टाकून अवैधरीत्या सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर कठोर कारवाई केली. पोलिसांनी पहाटेच्या सुमारास छापा टाकून गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे हजारो रुपयांचे साहित्य व रसायन मोठ्या प्रमाणात नष्ट केले.

 The villagers raid on the liquor bars | गावठी दारू भट्ट्यांवर छापा

गावठी दारू भट्ट्यांवर छापा

Next

जायखेडा : गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जायखेडा पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी धाडी टाकून अवैधरीत्या सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर कठोर कारवाई केली. पोलिसांनी पहाटेच्या सुमारास छापा टाकून गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे हजारो रुपयांचे साहित्य व रसायन मोठ्या प्रमाणात नष्ट केले. पोलिसांनी या आधीही ठिकठिकाणी धडक कारवाई करून मोठ्या प्रमाणात गावठी दारू बनविण्याच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा मोसम खोºयात गावठी दारू बनवण्याचा सपाटा सुरू अल्याची माहिती पुढे आली आहे. या बाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी काही निवडक पोलीस कर्मचाºयांना सोबत घेऊन अवैधरीत्या गावठी दारू हातभट्ट्यांवर छापा टाकला. यावेळी तब्बल पंचवीसशे लिटर गूळ मिश्रित रसायन नष्ट करण्यात आले. पोलीस आल्याची माहिती मिळताच संबंधित संशयीत घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाले. या संदर्भात पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून संबंधीताचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले. एकीकडे गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू असतांनाच मोसम खोºयात पुन्हा अवैध दारू विक्र ेते सक्र ीय झाले आहेत. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीसांनी कडक पाऊल उचलत जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंतापूर, दसवेल, तेलदरा, ताहाराबाद येथे पहाटेच्या सुमारास सुरू असलेल्या हातभट्ट्यांवर छापा टाकून पंचवीसशे लिटर गुळ मिश्रीत रसायन उद्ध्वस्त केले. उपविभागीय पोलीस आधिकारी शशीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड उपनिरीक्षक गोविंद सोनवणे, अंबादास थैल, दिलीप गायकवाड, राजेश सावळे, निंबा खैरनार, देवीदास माळी, निकेश कोळी, दिलीप गवळी, हरिश्चंद्र चव्हाण आदी कर्मचारी पथकाने हि कारवाई केली.

Web Title:  The villagers raid on the liquor bars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.