गावांमध्ये कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 03:48 PM2020-03-22T15:48:39+5:302020-03-22T15:49:54+5:30

निफाड : कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरासह परिसरातील गावांमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला. त्यामुळे दिवसभर शहरातील रस्ते ओस पडले होते.

Villages closed tightly | गावांमध्ये कडकडीत बंद

गावांमध्ये कडकडीत बंद

Next
ठळक मुद्दे बंद काळात निफाडमधील एक-दोन मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने बंद होती. नागरिकांनी घरीच थांबणे पसंत केले. लहान मुले छोटे-छोटे खेळ खेळून आपला वेळ घालवित होते. मार्केट यार्ड, रेल्वेस्थानक येथे शांतता होती.

नगरपंचायतीच्या वतीने औषध फवारणी करण्यात आली. निफाड येथील शांतिनगर त्रिफुली येथे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने उद्योग व्यवसाय, दुकाने, यावर परिणाम झाला आहे. निफाडमधील बँकांमध्ये ग्राहक जो रोख भरणा करायचे त्याचे प्रमाण खूप कमी झाल्याने चिंतेचे वातावरण आहे. याउलट बँकेतून पैसे काढण्याचे प्रमाण वाढले असून, एटीएममध्ये गर्दीचे प्रमाण वाढले आहे.
 

Web Title: Villages closed tightly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.