कोरोनाविरुद्धच्या लढाईत खेडेगावांचा पुढाकार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 02:46 PM2020-07-08T14:46:57+5:302020-07-08T14:47:40+5:30
पेठ - कोविड-१९ चा शिरकाव रोखण्यासाठी ग्रामीण भागातील खेडेगावांनी पुढाकार घेतला असून ग्रामपंचायत स्तरावर प्रतिबंधत्मक साहित्यासह खबरदारीचा उपाय म्हणून डोअर टू डोअर नागरिकांची थर्मल तपासणी केली जात आहे.

मुंबई, पुणे नाशिकसह ग्रामीण भागात कोरोनाने केलेला शिरकाव वाडी वस्ती वरील जनतेच्या मनात धडकी भरणारा आहे. फारशा आरोच्याच्या सुविधा नसलेल्या नागरिकांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन व ग्रामस्थ यांनी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत व नगरपंचायत कर्मचारी यांच्या मदतीने प्रत्येक घरातील नागरिकांची तपासणी केली जात आहे.
थरमल गण ( तापमापन यंञ), पल्स आॅक्सामीटर , अॅटोमॅटीक हॅन्ड सॅनीटाजर, हॅन्ड वॉश चे वाटप करण्यात आले आहे. बोरवठ येथील ग्रामपंचायत सॅनी टायझर डिस्पेंन्सर मशिन बसविण्यात आले आहे. यासाठी गावातील नागरिक,बचत गटाच्या सर्व महिला मंडळ यांचा सहभाग घेतला आहे. पेठ शहरात कोरोनाच्या शिरकावामुळे परिसरातील खेडयातील जनता सतर्क झाली आहे. आरोग्य, महसूल, पोलीस प्रशासनाकडून शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करण्याबाबत यंत्रणेव्दारे आवाहन करण्यात येत आहे.